Next
‘वारी नारीशक्तीमुळे महिलांसाठीच्या योजनांच्या प्रसाराला व्यासपीठ’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Monday, July 15, 2019 | 06:19 PM
15 0 0
Share this article:

कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. डावीकडून पालकमंत्री विजय देशमुख, अमृता फडणवीस, आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे

पुणे : ‘वारी नारीशक्तीची उपक्रमाने महिलांसाठीच्या योजनांच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी नवे व्यासपीठ मिळाले आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

राज्य महिला आयोगातर्फे वारीत संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखीमार्गावर ‘वारी नारीशक्तीची’ उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचा समारोप येथील शासकीय विश्रामगृहात मुख्यमंत्री फडणवीस, अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजय देशमुख आदी उपस्थित होते.  

फडणवीस म्हणाले, ‘महिला आयोगाने वारीमध्ये ‘वारी नारीशक्तीची’ अभिनव संकल्पना राबवून महिला योजनांच्या प्रसिद्धीस नवे दालन उपलब्ध केले. आषाढी वारीला ७०० वर्षांची परंपरा व इतिहास आहे. वारी सज्जन शक्तीचा आविष्कार आहे. या शक्तीचा वापर महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला आयोगाने या उपक्रमाच्या माध्यमातून केला आहे. ‘वारी नारीशाक्तीची’ या उपक्रमातून महिलांसाठी असणारे कायदे, आरोग्य योजना व त्यांच्या संरक्षणासाठी असलेल्या योजनाची माहिती महिलांपर्यंत पोहोचवण्यास मदत झाली. त्याचे परिणाम भविष्यात दिसतील.’

महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर म्हणाल्या, ‘वारी नारीशक्तीच्या उपक्रमांत महिलांची काळजी घेण्याचे काम केले. या कालावधीत सुमारे चार ते साडेचार लाख महिलांशी संवाद साधण्यात आला. माझी कन्या भाग्यश्री, अस्मिता यांसारख्या योजनांची माहिती महिलांना दिली. रोज प्रबोधनात्मक चित्रपट दाखवण्यात आले. कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आषाढी वारीनिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशाची चित्रफित दाखवण्यात आली.’

राज्य शासन महिलाकेंद्री अनेक योजना राबवत आहे. शासकीय योजनांची माहिती महिलांना व्हावी, यासाठी महिला आयोगाने ‘वारी नारीशक्तीची’ उपक्रम राबवला. वारीमध्ये प्रबोधनाच्या माध्यमातून योजनांचा प्रचार व प्रसार करण्यात आल्याचे रहाटकर यांनी सांगितले. 

पंतप्रधानांनी घेतली दखल
राज्य महिला आयोगातर्फे आयोजित ‘वारी नारीशक्तीची’ या उपक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक करून आपल्या ट्विटर अकाउंटवरून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत; तसेच त्यांनी या उपक्रमाबद्दल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचेसुद्धा कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

ट्विटर ट्विट करताना ते म्हणाले, ‘महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने ‘वारी नारीशक्ती’ हा उपक्रम हाती घेतल्याचे समजले आणि अत्यंत आनंद झाला. आजच्या आधुनिक समाजात असे उपक्रम ही काळाची गरज बनली आहे. महिलांमध्ये आरोग्य  आणि स्वच्छता यांविषयी जागृती करण्यासाठी राबविण्यात येणारे उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहेत. अशा उपक्रमांचे अनुकरण देशभर झाले पाहिजे. ‘वारी नारीशक्ती’ या उपक्रमाला महिलांचा व्यापक प्रतिसाद मिळून, हा उपक्रम यशाचा कळसाध्याय गाठो, अशी प्रार्थना मी करतो. महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि आषाढी पालखी सोहळ्यात सहभागी भाविक आणि संयोजकांना हार्दिक शुभेच्छा.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search