Next
ऑनलाइन संवाद सत्राला चांगला प्रतिसाद
प्रेस रिलीज
Friday, September 14 | 04:37 PM
15 0 0
Share this story

पुणे : भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तानमधील अमेरिकन वकिलातीच्या वतीने ‘प्रमोटिंग टॉलरन्स इन डिजिटल एज’ विषयावर ऑनलाइन संवाद सत्र नुकतेच आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.

अमेरिकन वकिलात मुंबईतील सहाय्यक सांस्कृतिक कार्य अधिकारी जोनाथन हवांग यांनी प्रास्ताविक केले. डेबोस्मिता यांनी समारोप केला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एज्युकेशन मल्टिमीडिया रिसर्च सेंटरचे प्राध्यापक डॉ. बाळकृष्ण दामले यांनी ‘सोशल मीडिया, तंत्रज्ञानाचा सहिष्णुता वाढविण्यासाठी उपयोग’ या विषयावर मार्गदर्शन केले. साबीर सय्यद (मुंबई) यांनी ‘हिंसकता आणि कट्टरतेला तोंड देण्यासाठी मोबाइल अॅप तंत्रज्ञानाचा उपयोग’ या विषयावर मार्गदर्शन केले.

तिन्ही देशातील तज्ज्ञ, संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक या संवाद सत्रात सहभागी झाले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link