Next
अभिनय कला केंद्राचे दुसरे सत्र उत्साहात
प्रशांत सिनकर
Thursday, April 04, 2019 | 01:43 PM
15 1 1
Share this article:


ठाणे : अभिनय क्षेत्रात काम करण्याची आवड असणाऱ्या बालकांसह नवतरुणांना संधी मिळावी यासाठी हक्काचे व्यासपीठ असलेल्या ठाण्यातील कचराळी तलाव कट्ट्यावर रोहित गायकवाड यांनी अभिनय कला केंद्राची सुरुवात केली. ३१ मार्चला या कला केंद्राचे दुसरे सत्र पार पडले. 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व ‘मॅक्सरीच रिसोर्सेस’चे संचालक आनंद नरसुळे आणि श्रेया गायकवाड यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमची सुरुवात करण्यात आली. स्वामी समर्थांच्या तारक मंत्रानंतर एकपात्री प्रयोगाला सुरुवात झाली. त्यात मिहीर बागडे या छोट्या कलाकाराने दत्तस्तोत्र सादर केले. अमोल चोरघडे याने ‘गाव ते मुंबईचा प्रवास’ असा एकपात्री प्रयोग सादर केला. ज्योती काशिकेदार यांनी ‘मी रौनी कपूरला भेटले’ हा एकपात्री प्रयोग सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. 

प्राजक्ता डोलारे हिने पावसावर आधारित एकपात्री प्रयोगातून भर उन्हाळ्यात प्रेक्षकांना पावसाची आठवण करून दिली. अभय पोफळे यांनी ‘कराओके’ गाण्यांद्वारे आणि आपल्या सुंदर भक्तिगीतांनी प्रेक्षकांची मने जिंकली. सागर कांबळे याने ‘सेल्स मार्केटिंग’ या विषयावर एकपात्री सादरीकरण केले. जितेश बागवे याने शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला. संकेत पडवेकर आणि त्याच्या टीमने ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या’ या विषयावर पथनाट्य सादर केले. 

कार्यक्रमाचे निवेदन अभिनय कला केंद्राचे संस्थापक डॉ. प्रशांत बागडे यांनी केले. अनेक कलाकारांना आपली कला सादर करता यावी आणि त्यांना व्यासपीठ मिळावे यासाठी सुरू करण्यात आलेला अभिनय कला केंद्राच्या या उपक्रमातून अनेक नवीन कलाकार समोर येत असल्याचे दिसत आहे. रोहित गायकवाड यांनी याआधी सचिन घाग दिग्दर्शित ‘फ्रेंडशिप बँड’ या मराठी चित्रपटातून प्रमुख भूमिका केली होती. मध्यंतरी ‘झी युवा’वरील ‘फुलपाखरू’ या मालिकेतूनदेखील त्यांनी भूमिका बजावली. अनेक नाटक, एकांकिका, लघू चित्रपटांचे दिग्दर्शनदेखील त्यांनी केले आहे. शिवाय दिव्यांग कलाकारांनाही आपली कला सादर करता यावी यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे.

कचराळी तलाव येथील कट्ट्यावर अभिनय कला केंद्र सुरू करण्यासाठी ठाणे महानगरपालिका परिवहन समिती सदस्य राजेश मोरे आणि स्थानिक नगरसेविका रुचिता मोरे यांनी या उपक्रमाला विशेष सहकार्य केले असल्याचे केंद्रातर्फे सांगण्यात आले.
 
15 1 1
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search