Next
२५ ऑगस्टला ठाण्यात ‘उद्योजक शिवाजी महाराज’ कार्यक्रम
‘ठाणे फर्स्ट’ संघटनेमार्फत आयोजन
BOI
Saturday, August 24, 2019 | 05:04 PM
15 0 0
Share this article:

ठाणे : तरुणांना उद्योगासाठी प्रेरणा मिळण्याच्या हेतूने ठाण्यात वागळे इस्टेटमधील किसननगरमध्ये २५ ऑगस्ट रोजी ‘उद्योजक छत्रपती शिवाजी महाराज’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राजमाता जिजाऊ यांचे वंशज आणि इतिहासकार प्रा. नामदेवराव जाधव हा कार्यक्रम सादर करतात. ‘ठाणे फर्स्ट’चे अध्यक्ष संजय घाडीगावकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

‘किसननगर - वागळे इस्टेट हा भाग एके काळी ठाण्यातील तरुणांना नोकरी उपलब्ध करून देत होता; पण आता तरुणांना रोजगाराच्या संधी फार कमी झाल्या आहेत. म्हणूनच या कार्यक्रमातून तरुणांना स्वतःचा व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळावी, या हेतूने किसननगरमध्ये पहिल्यांदाच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवरायांच्या विचारांतून तरुणांनी प्रेरणा घ्यावी,’ असे आवाहन संजय घाडीगावकर यांनी केले आहे. या कार्यक्रमात प्रा. नामदेवराव जाधव यांना महाराष्ट्र यूथ आयकॉन पुरस्कार देऊनही गौरवण्यात येणार असल्याचे घाडीगावकर यांनी सांगितले.

व्यवसायातील चढ-उतार, त्यात यशस्वी होण्यासाठी काय करावे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या कार्यक्रमात तरुणांना मिळणार आहेत. रविवारी, २५ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता ठाणे महापालिका शाळा हॉल किसननगर ३, रोड नं १६, वागळे इस्टेट येथे हा कार्यक्रम होणार असून, तो सर्वांसाठी मोफत खुला आहे.

प्रा. नामदेवराव जाधव यांच्या हस्ते या वेळी ठाण्यातील समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या व्यक्तींचा सन्मानही केला जाणार आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search