Next
शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडून दाखवावेच
प्रभात
Friday, February 17, 2017 | 10:11 AM
15 0 0
Share this article:कॉंग्रेस नेते मनीष तिवारी यांचे शिवसेनेला आव्हान


मुंबई - राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडून दाखवावे, असे आव्हान कॉंग्रेसने दिले आहे. सरकार "नोटीस पिरीयड'वर असल्याचे सांगून कोणत्याही क्षणी शिवसेना राज्य सरकारमधून बाहेर पडेल, असे संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर कॉंग्रेसने शिवसेनेला हे आव्हान दिले आहे. मुंबई महापालिकेतील घोटाळ्यावरून मुंबईकरांचे लक्ष विचलित व्हावे, यासाठीच शिवसेना आणि भाजप एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दोन्ही पक्षांचे परस्परांशी संगनमत आहे. तसे नसेल तर मग शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे, असे कॉंग्रेसचे प्रवक्‍ते मनीष तिवारी यांनी आज पत्रकार परिषदेत म्हटले आहे.


मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हा राज्यातील इतर महापालिकांपेक्षा अधिक असूनही मुंबईचा विकास झालेला नाही. मुंबई

शहरात मेट्रो, मोनो रेल्वे सेवा, मुक्‍त मार्ग, सी-लिंक आदी कामे कॉंग्रेस सरकारच्या काळात झाली आहेत. मुंबई महापालिकेने कोणत्याच नवीन योजना राबवल्या नाहीत असे मनीष तिवारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मुंबईत सर्वत्र लागलेल्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र दिसत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हेच मुंबईचे महापौर होणार आहेत काय. नरेंद्र मोदी यांच्याशिवाय भाजपकडे चेहरा नाही. विधानसभेच्या निवडणुका होत असलेल्या इतर राज्यांमध्येही केवळ मोदींचाच चेहरा दिसतो आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

नोटाबंदीनंतर पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या राज्यांमध्ये निवडणुकीसाठी भाजपकडूनच पैसा पुरवला जातो आहे. हा पैसा भाजपकडे कोठून आला असा सवाल करताना नोटाबंदीचे राजकारण केवळ आगामी काळातील विधानसभांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केले गेल्याची टीकाही तिवारी यांनी केली. नोटाबंदीच्या काळात रिझर्व्ह बॅंकेने स्वतःची स्वायत्तता गमावली आणि केंद्राच्या तालावरच ताल धरायला सुरुवात केल्याचेही ते म्हणाले.


शिवसेना हप्तेखोर तर कारवाई करा...


मुंबई महापालिकेचे साडेसात वर्षे ऑडिट झाले नाही. त्यामुळे महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराला शिवसेना-भाजप हे दोघेही जबाबदार आहेत, मुंबईतील रस्त्यांसाठी अर्थसंकल्पात दरवर्षी 9 हजार कोटींची तरतूद केली जाते. तरीही येथील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. प्रतिकिलोमीटरला साडेचार कोटींचा घोटाळा होत आहे, असा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते संजय झा यांनी केला. शिवसेना हप्तेखोर आहे. मग देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर कारवाई का करत नाहीत, अशा शब्दांत कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनीही शिवसेना आणि भाजपसह मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search