Next
ब्रह्मानंद देशपांडे, दत्ता भगत
BOI
Wednesday, June 13, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this article:

थोर इतिहास संशोधक महामहोपाध्याय ब्रह्मानंद देशपांडे आणि दलित रंगभूमीवरचे प्रख्यात नाटककार दत्ता भगत यांचा १३ जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
...... 
ब्रह्मानंद श्रीकृष्ण देशपांडे

१३ जून १९४० रोजी रिसोडमध्ये जन्मलेले ब्रह्मानंद श्रीकृष्ण देशपांडे हे महामहोपाध्याय या उपाधीने ओळखले जाणारे थोर इतिहास संशोधक होते. प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती, पुरातत्त्वशास्त्र, शिलालेख, ताम्रपट, तसंच प्राकृत आणि अपभ्रंश झालेली भाषा या विषयांचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. सातवाहन काल, पैठण, अजिंठा वेरुळ लेणी, महानुभाव पंथ, संतवाङ्मय हेही त्यांच्या विशेष अभ्यासाचे विषय होते. मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत, गुजराथी, कन्नड, बंगाली, उर्दू, बुंदेलखंडी, छत्तीसगढी अशा अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. महानुभाव मासिकाचे ते संपादक होते. 

मातीवचे मार्दव, महानुभावीय शोधनिबंध, चक्रपाणी-चिंतन, शोधमुद्रा खंड १ ते ४, सप्तपर्णी, इये नाथांचिये नगरी, भुत्तो - एक वादळ, तीन शोधनिबंध, दी गुप्ता अॅडमिनिस्ट्रेशन, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 
२००९ साली नगरमध्ये भरलेल्या अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ते अध्यक्ष होते. 

त्यांना भूमिपुत्र पुरस्कार, संत साहित्य संशोधन पुरस्कार असे सन्मान प्राप्त झाले आहेत. 

सहा ऑगस्ट २०१३ रोजी त्यांचा पुण्यात मृत्यू झाला.

(ब्रह्मानंद देशपांडे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
.....

दत्तात्रय गणपत भगत

१३ जून १९४५ रोजी नांदेडमध्ये जन्मलेले दत्तात्रय गणपत ऊर्फ दत्ता भगत हे दलित रंगभूमी आणि चळवळीतले प्रमुख नाटककार म्हणून प्रसिद्ध आहेत. ते स्पष्टवक्ते आणि निर्भीडपणे मांडणी करणारे अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत. समाजातल्या विषमतेवर बोट ठेवून त्यावर त्यांनी लेखन केलं आहे.
 
अश्मक, मराठी दलित एकांकिका, निवडक एकांकिका, सात शिखरे, तृतीय रत्न, आवर्त, खेळीया, निळी वाटचाल, पिंपळपानांची सळसळ, साहित्य समजून घेताना, वाटा पळवाटा, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

२००६ साली नांदेड येथे झालेल्या ८६व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 

(दत्ता भगत यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search