Next
शिवसेनेत बंडखोर कार्यकर्त्यांना पदांच्या ऑफर्स; बंड शमविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न!
BOI
Saturday, February 04, 2017 | 12:00 AM
15 0 0
Share this article:

सेनेने बंडखोरांपुढे संघटनेतील पदांचे आमिष ठेवले आहे. पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या बंडखोर कार्यकर्त्यांच्या मनधरणीसाठी शिवसेनेने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. सेनेने या बंडखोरांपुढे संघटनेतील पदांचे आमिष ठेवले आहे. या बंडखोरांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले असले तरी येत्या ७ तारखेपर्यंत हे अर्ज माघारी घेतले जाऊ शकतात. त्यामुळे या वेळेत बंडखोरांची समजूत काढून त्यांना पुन्हा पक्षात आणण्याचे प्रयत्न शिवसेनेने सुरू केले आहेत. यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी पुढाकार घेतला असून ते या बंडखोरांशी चर्चा करत आहेत. प्रभादेवी भागात सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर याला उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेल्या महेश सावंत यांनी काल अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, आता त्यांची समजूत काढण्यासाठी पक्षाने त्यांना विभाप्रमुखपद देऊ केले आहे. तर अभ्यूदनगरमधील बंडखोर जयसिंग राठोड यांच्यासमोर पक्षाकडून प्रभारीपदाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी वरळी परिसरात सेनेत आणखी एक बंडखोरी पाहायला मिळाली. वरळी कोळीवाडा येथून हेमांगी वरळीकर यांनी उमेदवारी दिल्याने नवनाथ करंदेकर यांनी पक्षाला आव्हान दिले आहे. इतर पक्षांच्या तुलनेत शिवसेनेत सर्वाधिक बंडखोरी झाली. बंडखोरांनी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना आव्हान दिल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची तारीख ७ फेब्रुवारी आहे. तोपर्यंत बंडखोरांना थंड करण्यात मातोश्रीला यश येत का ?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search