Next
‘भुलभुलैय्या’च्या सीक्वलमध्ये दिसणार कार्तिक आर्यन
‘डॉ. श्रीवास्तव’च्या भूमिकेत पुन्हा असेल अक्षय कुमार?
BOI
Tuesday, July 16, 2019 | 05:09 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : २००७मध्ये आलेला ‘भुलभुलैय्या’ हा चित्रपट त्यातील कलाकारांच्या अभिनयामुळे आणि चित्रपटातील गाण्यांमुळे हिट ठरला होता. निर्माते भूषण कुमार आता या चित्रपटाचा सीक्वल घेऊन येत आहेत. अभिनेता कार्तिक आर्यन चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून ‘डॉ. आदित्य श्रीवास्तव’च्या भूमिकेसाठी पुन्हा एकदा अक्षय कुमारच्या नावाची चर्चा सुरू आहे. 

गाजलेल्या चित्रपटांचे सीक्वल येणे ही बॉलीवूडसाठी नवीन बाब नाही. आजवर अनेक चित्रपटांचे सीक्वल आले आहेत. १९७८चा ‘पती, पत्नी और वो’ आणि १९७५चा ‘चुपके चुपके’ या चित्रपटांच्या सीक्वलवर सध्या काम सुरू आहे. या धर्तीवर निर्माते भूषण कुमार यांनी ‘भुलभुलैय्या’ चित्रपटाचा सीक्वल आणण्याची केलेली घोषणा चित्रपटाच्या चाहत्यांसाठी सुखावणारी आहे. 

अक्षय कुमार, विद्या बालन, शायनी आहुजा, अमिषा पटेल अशा कलाकारांच्या अभिनयामुळे ‘भुलभुलैय्या’ चित्रपट चांगलाच गाजला होता. त्यातील गाणीही सूपरहिट ठरली. या चित्रपटाच्या सीक्वलसाठी कुमार यांच्या ‘टी सीरिजने’ ‘भुलभुलैय्या २’ हे नाव निश्चित केले आहे. एका प्रसिद्ध माध्यमाच्या वृत्तानुसार चित्रपटात ‘डॉ. आदित्य श्रीवास्तव’ यांच्या भूमिकेसाठी पुन्हा अक्षय कुमारच्या नावाची चर्चा होत आहे, परंतु निर्मात्यांनी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

प्रियदर्शन दिग्दर्शित ‘भुलभुलैय्या’ हा चित्रपट २००५चा तमिळ चित्रपट ‘चंद्रमुखी’चा रिमेक आहे आणि ‘चंद्रमुखी’ हादेखील ‘मनीचित्रथाझु’ या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. ‘भुलभुलैय्या’ चित्रपटात अभिनेत्री विद्या बालनने साकारलेली भूमिका महत्त्वाची आणि आव्हानात्मक आहे. त्यामुळे सीक्वलमध्ये ही भूमिका कोण साकारेल याची उत्सुकता आहे. अभिनेत्याचे नाव निश्चित झाल्यानंतर अभिनेत्रीच्या नावावर चर्चा करण्यात येणार असल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे. 

दरम्यान अनीस बज्मी लवकरच चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात करणार असून भूषण कुमार चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.   
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search