Next
‘ध्रुव कन्सल्टन्सी’ची एसएमई मंचावर ऑफर
प्रेस रिलीज
Tuesday, March 13 | 05:29 PM
15 0 0
Share this story

पुणे: ध्रुव कन्सल्टन्सी सर्व्हिस लिमिटेड ही कंपनी पायाभूतसेवा डिझाईन, स्थापत्य, खरेदी, बांधकाम आणि प्रकल्प व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये हायवे, पूल, बोगदे, बंदरे इत्यादी बांधकामविषयक सल्ले देण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी आता भांडवली बाजारपेठेत पदार्पण करत असून सुरुवातीला १० रुपये  मूळ किंमत असलेले ४३ लाख शेअर्स विक्रीसाठी खुले करत आहे. या समभागांची किंमत प्रती शेअर  ५४ रुपये  आहे.

या विक्रीद्वारे उभा होणारा निधी मुदतपूर्व कर्जफेडीसाठी, खेळत्या भांडवलासाठी, सर्वसाधारण कार्यालयीन हेतूंसाठी आणि या इश्यूसाठीच्या खर्चाची तरतूद करण्यासाठी वापरला जाईल. मुंबई शेअरबाजाराच्या (बीएसई) एसएमईपातळीवर या समभागांची नोंदणी होईल. 

या इश्यूचे मुख्य व्यवस्थापक ‘हेम सिक्युरिटीज लिमिटेड’ आहेत. तर,नोंदणीप्रमुख ‘शेरेक्सडायनामिक(इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड हे आहेत.  
ठराविक किंमत पद्धतीने हा इश्यू खुला होत असून नेट इश्यूचा ५० टक्के  भाग हा योग्य प्रमाणात किरकोळ आणि प्रासंगिक गुंतवणूकदारांसाठी तर उरलेला ५० टक्के  भाग हा योग्य प्रमाणात इतर (कितीही शेअर्ससाठी निवेदन आले असेल तरीही) मोठ्या गुंतवणूकदारांसाठी असेल. हा संपूर्ण व्यवहार सेबी आणि आयसीडीआरच्या नियमांनुसार आणि ठराविक किमतीनेच होईल. दोन्ही विभागांमधल्या उरलेल्या शेअर्सची वाटणी मागण्यांच्या योग्य प्रमाणात केली जाईल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link