Next
दुष्काळाचे वास्तव सांगणारा ‘एचटूओ (H2O)’
BOI
Thursday, March 14, 2019 | 05:11 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : ‘पाणी’ ही माणसाची जीवनावश्यक बाब आहे. पाण्याशिवाय जगणे नाही. पाण्याविना लोकांची, शेतकऱ्यांची काय परिस्थिती होते, याचे चित्र आपण पाहतोच. अशाच एका विषयावर भाष्य करणारा ‘एचटूओ (H2O)’ हा नवीन चित्रपट येऊ घातला आहे. येत्या १२ एप्रिलला प्रदर्शित होणार असलेल्या या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे. 

‘एचटूओ’ ही पाण्याची वैज्ञानिक परिभाषा आहे. म्हणजेच विज्ञानाच्या भाषेत पाण्याला ‘एचटूओ’ म्हणून संबोधले जाते. याच पाण्याचे अस्तित्व आणि महत्त्व विशद करणारा हा चित्रपट असावा असा प्राथमिक अंदाज चित्रपटाच्या पोस्टरवरून लावता येऊ शकतो. सामान्य माणसाच्या जीवनात पाण्याचे जेवढे महत्त्व असते, त्याहीपेक्षा जास्त ते एका शेतकऱ्याच्या जीवनात असते. 

भेगाळलेली जमीन आणि त्यावर सांडलेले पाण्याचे काही थेंब असे चित्र असलेले पोस्टर हे दुष्काळाची जाणीव करून देते. याशिवाय आणखी एक बाब या पोस्टरमध्ये दिसून येते, ती म्हणजे यामध्ये दोन व्यक्तींचे पाय दिसत आहेत, यापैकी एकाच्या पायात बूट आहेत, तर दुसऱ्याच्या पायात चप्पल आहे. 

दिग्दर्शक मिलिंद पाटील यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून सुनील झंवर यांची निर्मिती आहे. चित्रपटाच्या शीर्षकासोबत, ‘कहानी पाण्याची’ अशी टॅगलाईनही पोस्टरमध्ये दिसते. चित्रपटाच्या प्रदर्शनाची ताऱीख वगळता अन्य कोणतीही माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे यात कोणत्या कलाकारांची वर्णी लागेल आणि चित्रपटाची कथा काय असेल, या गोष्टी अद्याप गुलदस्त्यात आहेत. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search