Next
४५ प्रसिद्ध चित्रकारांचे पुण्यात एकत्र प्रदर्शन
‘व्हीनस आर्ट फेस्ट २०१९’चे आयोजन
BOI
Wednesday, June 05, 2019 | 05:22 PM
15 0 0
Share this article:


पुणे : सांस्कृतिक वारसा असलेल्या पुण्यनगरीतील निवडक ४५ चित्रकारांची चित्रे प्रथमच एकाच व्यासपीठावर बघायला मिळणार आहेत. ‘व्हीनस आर्ट फेस्ट २०१९’ हे चित्र प्रदर्शन शनिवार, आठ जून ते सोमवार, दहा जूनपर्यंत बालगंधर्व रंगमंदिर येथील बालगंधर्व कलादालन येथे भरविण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.  

‘या निमित्ताने आपापल्या माध्यमात उत्तम प्रकारे नावारूपाला आलेले ४५ चित्रकार प्रथमच एका व्यासपीठावर येत आहेत. यात ज्येष्ठ चित्रकारांपासून ते आजच्या काळातील नावाजलेल्या चित्रकारांपर्यंत अनेक दिग्गजांचे काम पाहण्याची संधी चित्रप्रेमींना मिळणार आहे. यात रवी परंजापे, मुरली लाहोटी, रावसाहेब गुरव, जयप्रकाश जगताप, सुधाकर चव्हाण, शोभा पत्की, मंजिरी मोरे, स्नेहल पागे, संदीप यादव, संजय भालेराव, विलास कुलकर्णी, विवेक निंबाळकर, शरद तरडे, आदित्य शिर्के आदींच्या कलेचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन आठ तारखेला सकाळी ११ वाजता खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे,’ अशी माहिती व्हीनस ट्रेडर्सचे सुरेंद्र करमचंदानी यांनी दिली. ‘त्याचप्रमाणे या वर्षी कला क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या कलाकारांचा या वेळी सत्कार करण्यात येणार आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

‘या प्रदर्शनात पेन्सिल, चारकोल, खडू, जलरंग, तैलरंग, अॅक्रॅलिक इत्यादी सर्वच माध्यमांतील चित्रे पहायला मिळतील. निसर्गचित्र, संकल्पना घेऊन केलेले चित्र, अमूर्तचित्र असे विविध प्रकारही न्याहाळण्याची संधी मिळणार आहे. कोणत्या चित्रकाराचे काय वैशिष्ट्य आहे हे ध्यानात ठेवत चित्रांची निवड व मांडणी केली जाणार आहे. याशिवाय काही वास्तुविशारादांची स्केचेस आणि शिल्पकलेचे काही नमुनेही येथे रसिकांना बघायला मिळणार आहेत. या तीन दिवसीय प्रदर्शनात दुसऱ्या दिवशी रविवारी, नऊ जून रोजी सकाळी ११ ते १ या सत्रात लहान मुलांसाठी चित्रकलेची कार्यशाळा, तर सायंकाळी चार ते सात या वेळेत कलाप्रेमींसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनातही विविध प्रात्याक्षिकेही सादर होणार असून, यातील एक विशेष आकर्षण म्हणजे, तुमच्या नावाची स्वाक्षरी मराठीत विविधप्रकारे कशी करायची याचे प्रात्यक्षिक गोपाल वाकोडे  दाखविणार आहेत,’ अशी माहितीही करमचंदानी यांनी दिली. 

कार्यक्रमाविषयी :
४५ चित्रकारांचे चित्रप्रदर्शन
स्थळ : बालगंधर्व कलादालन
दिवस व वेळ : शनिवार, ८ जून ते सोमवार, दहा जून, सकाळी ११ ते ७.३०
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Nilam mandlik About 102 Days ago
This "Art" will be fantastic. Thanks !
0
0
Sanjay Rohidas Bhagat About 102 Days ago
Great I will not miss the chance to visit. Thanks for this opportunity.
0
0

Select Language
Share Link
 
Search