Next
राज्यस्तरीय ढोलकीवादन स्पर्धेत तेजस मोरेचे यश
प्रशांत सिनकर
Wednesday, April 03, 2019 | 12:49 PM
15 0 0
Share this article:ठाणे : सांगली येथे घेण्यात आलेल्या ढोलकीबहाद्दर तानाजी वाडकर स्मृती ढोलकीवादन राज्यस्तरीय स्पर्धेत प्रख्यात ढोलकीवादक कृष्णाजी घोटकर यांचा शिष्य तेजस पुंडलिक मोरे दुसर्‍या क्रमांकाचा मानकरी ठरला.

सांगली जिल्ह्यातील भावे नाट्यमंदिर येथे दोन एप्रिल २०१९ रोजी ढोलकीसम्राट पैगंबरवासी यासीन म्हाब्री यांचे शिष्य ढोलकीबहाद्दर तानाजी वाडेकर स्मृती राज्यस्तरीय खुली ढोलकीवादन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत राज्यभरातून अनेक ढोलकीपटू सहभागी झाले होते. तेजस मोरे हा मूळचा सुधागड तालुक्याचा (जि. रायगड) असून, तो सध्या ठाण्यात राहत आहे. त्याने यापूर्वी सह्याद्री वाहिनीवरील ‘ढोलकी झाली बोलकी’ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. ठाण्यातील दैनिक जनादेश गौरव पुरस्कारानेही त्याला गौरविण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या ठाणे महापौर भजन स्पर्धेतही तेजस मोरे अव्वल ठरला होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे व ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनीदेखील तेजसच्या कलेचे कौतुक केले आहे. अवघ्या १३व्या वर्षी ढोलकीवादनातील १२ प्रकार आत्मसात करणार्‍या तेजसने ठाणे, मुंबई, आळंदी, पंढरपूर येथील ढोलकीवादन स्पर्धांमध्येही आपल्या कलेचा ठसा उमटवला आहे.ढोलकीसम्राट तानाजी वाडेकर यांचे चिरंजीव संदीप वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली सांगली येथे झालेल्या ढोलकीवादन स्पर्धेत तेजसने सुरुवातीपासूनच आपल्या ढोलकीतील स्वरतरंगांनी रसिकांची मने जिंकली. अंतिम फेरीत तेजस दुसर्‍या स्थानावर विजेता ठरला. या वेळी परीक्षक म्हणून मुंबईतील सुप्रसिद्ध ढोलकीवादक नवीनभाई शर्मा व संजय साळुंके यांनी काम पहिले. तेजसला स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search