Next
डॉ. सच्चिदानंद शेवडे यांना ‘ब्राह्मण भूषण’ पुरस्कार जाहीर
BOI
Wednesday, April 17, 2019 | 03:44 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘आम्ही सारे ब्राह्मण’ पाक्षिकातर्फे दिला जाणारा या वर्षीचा ‘ब्राह्मण भूषण’ पुरस्कार प्रसिद्ध प्रवचनकार व लेखक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांना आणि ‘इंदुमती-वसंत करिअर भूषण’ पुरस्कार दापोली येथील मधुमक्षिकापालन व मत्स्य व्यवसाय क्षेत्रात कार्यरत असणारे सृजन कुलकर्णी यांना देण्यात येणार आहे.

पाक्षिकाचा आठवा वर्धापनदिन समारंभ २० एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी ५.३० वाजता येथील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात होत आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रामचंद्र देखणे असून, बुलडाणा अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती पाक्षिकाचे मुख्य संपादक भालचंद्र कुलकर्णी यांनी येथे दिली. मानपत्र, पुणेरी पगडी व उपरणे असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
या कार्यक्रमात मैत्र जीवाचे या संस्थेच्या सहकार्याने दिले जाणारे ‘गुणवंत लेखक’ पुरस्कार प्रसाद जोशी (पुणे), श्यामसुंदर मुळे (बार्शी), सुधीर मेथेकर (पुणे) यांना, ‘गुणवंत ब्राह्मणमुद्रा’ पुरस्कार शीला परळीकर (पुणे), विवेक नवरे (डोबिंवली) यांना, आणि ‘गुणवंत प्रतिनिधी’ पुरस्कार वामन कुलकर्णी (फलटण, जि. सातारा), अनंतराव कुलकर्णी (चिंचवड), वैशाली रामदासी (तळेगाव दाभाडे, जि. पुणे) यांना पाक्षिकाच्या वर्धापनदिनी प्रदान केले जाणार आहेत.
 
या कार्यक्रमाच्या मध्यंतरानंतर प्रसिद्ध साहित्यिक व संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या संत एकनाथ विरचित ‘बहुरूपी भारुड’ या गाण्यांचा कार्यक्रम होईल.
 
पाक्षिकातर्फे यापूर्वी अपर्णाताई रामतीर्थकर (२०१३), अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी (२०१४), एअर मार्शल भूषण गोखले (२०१५), पंडित वसंतराव गाडगीळ (२०१६), ‘पितांबरी’चे रवींद्र प्रभुदेसाई (२०१७) व पौरोहित्यांचे संघटन करणाऱ्या श्री सद्गुरू ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष यशवंत कुलकर्णी (२०१८) यांना ब्राह्मण भूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी एक फेब्रुवारी २०११पासून ‘आम्ही सारे ब्राह्मण’ हे पाक्षिक सुरू झाले आहे. सुरुवातीपासून चांगला प्रतिसाद लाभलेल्या या पाक्षिकाने यशस्वीरित्या ९व्या वर्षात पदार्पण केलेले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search