Next
अनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग १२
BOI
Tuesday, August 13, 2019 | 12:08 PM
15 0 0
Share this article:

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्याची ओळख नव्या पिढीला होण्याच्या उद्देशाने पुण्यातील ‘रिव्हर्ब प्रॉडक्शन्स’ने ‘अनादि मी अनंत मी’ या नाटकाचे ध्वनिनाट्य रूपांतरण केले आहे. ते ऑडिओ बुकगंगा वेबसाइटवरून मोफत ऐकता येणार आहे. या ध्वनिनाट्याचा बारावा भाग आता प्रसिद्ध झाला असून, त्यात काय ऐकता येईल, त्याबद्दलची ही माहिती...
............
ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध अनेक वर्षं चाललेल्या लढ्याचं परिमार्जन १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून झालं; मात्र स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षं सावरकरांना भारतीय सरकारनं उपेक्षित ठेवलं आणि सक्रिय राजकारणापासून त्यांच्या विचारधारेला बाजूला ठेवलं गेलं. अखंड भारताच्या विभाजनामुळे सावरकरांचं मन दुखावलं. सिंधू नदीपासून सिंधुसागरापर्यंत पसरलेला भरतखंड एकत्रित राहण्याचं त्यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं. पाकिस्तानातल्या हिंदू स्त्री-पुरुषांवर अनन्वित अत्याचार झाले. पुढील अनेक वर्षं सावरकरांनी हिंदुस्थानाच्या युवा सशक्तीकरणासाठी अखंड प्रयत्न चालूच ठेवले. या स्वातंत्र्यसूर्यानं १९६६ साली प्रायोपवेशन करून आपलं जीवनकार्य थांबवायचा निर्णय घेतला. ‘धन्योहं, धन्योहं, कर्तव्यं मेन विद्यते किंचित, धन्योहं, धन्योहं, प्राप्तव्यं सर्वम् अद्य संपन्नम्.’ त्यांची अथक राष्ट्रनिष्ठा, अचल मनोधैर्य, अजोड बुद्धिमत्ता, दूरदर्शी विचारधारा, ओघवतं वक्तृत्व, सखोल साहित्यमाला आणि सूर्यासारखे तेजस्वी व्यक्तिमत्त्व शतकानुशतकं मनामनांना स्फुरण देत राहावं आणि त्यांच्या जीवनप्रवासातल्या सत्य घटना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी केलेला आमचा हा छोटासा प्रयत्न. स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहे!

लेखक/दिग्दर्शक : माधव खाडिलकर
संगीत : आशा खाडिलकर
निर्मिती : ओंकार खाडिलकर
सहनिर्माते : रिव्हर्ब प्रोडक्शन्स
संगीत संयोजन : आदित्य ओक
ध्वनिसंयोजन : मंदार कमलापूरकर
डिजिटल पार्टनर : स्मृतिगंध
सौजन्य : उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट

(ध्वनिनाट्याचा बारावा भाग ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. ध्वनिनाट्याच्या पहिल्या ११ भागांच्या लिंक्सही खाली दिल्या आहेत. या नाटकाची आणि ध्वनिनाट्याची निर्मितीकथा वाचण्यासाठी येथे क्लिक करा. )
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search