Next
मुख्याध्यापक नंदकुमार मंद्रुपकर सेवानिवृत्त
प्रेस रिलीज
Thursday, August 03, 2017 | 11:11 AM
15 0 0
Share this article:

नंदकुमार मंद्रुपकर यांचा सत्कार करताना डॉ. सुरेश भोसले. शेजारी शिवाजीराव मोहिते, संजय पवार, हणमंत धर्मे व अन्य मान्यवर.रेठरे बुद्रुक (सातारा) : येथील ताराबाई माधवराव मोहिते विद्यालयाचे मुख्याध्यापक नंदकुमार मंद्रुपकर नुकतेच सेवानिवृत्त झाले. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते होते.

कार्यक्रमाला शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव बी. एन. थोरात, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष संजय पवार, जिल्हा परिषद सदस्या श्यामबाला घोडके, सरपंच प्रवीणा हिवरे, उपसरपंच हणमंत धर्मे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी एस. एन. मंद्रुपकर, छत्रपती संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एन. थोरात आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या सत्कार समारंभाप्रसंगी बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले की, ‘शिक्षकांनी निवृत्तीनंतरही समाजासाठी योगदान द्यावे. आपण समाजासाठी देणे लागतो या भूमिकेतून सामाजिक कार्यात सक्रिय रहावे. जगात शिक्षणात होणाऱ्या बदलांचे वेध घेऊ, येथे शैक्षणिक क्षेत्रात बदल करणे आवश्यक आहे. आप्पासाहेबांनी दूरदृष्टीने ही संस्था उभारली आहे. यामध्ये शिक्षणाची वाटचाल अखंडपणे सुरू आहे. संस्थेने पालकांमध्ये सकारात्मक बदल निर्माण केला असून, गुणवत्तावाढीसाठी पालकांचा सहभागही आवश्यक आहे.’

अध्यक्षीय भाषणात शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावत असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन करावे, असे आवाहन केले.

या वेळी मुख्याध्यापक नंदकुमार मंद्रुपकर व त्यांच्या सुविद्य पत्नी राधिका मंद्रुपकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. सुरेश भोसले यांना साखर उद्योगातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्यालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला. शुभांगी कोरडे व जी. एस. माळी यांनी सूत्रसंचालन केले. एच. एस. पाटील यांनी स्वागत केले. पर्यवेक्षक एच. बी. देशमुख यांनी प्रास्ताविक केले व एस. पी. सावंत यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sanjay kulkarni About
भावी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा। आपणास उत्तम आरोग्य दीर्घायुष्य लाभो। तसेच या पुढील काळात आपले हातून उत्तम शैक्षणिक कार्य होवो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना।
0
0
Hanmant M. Patil About
Very nice
1
0

Select Language
Share Link
 
Search