Next
चटपटे मोती
BOI
Wednesday, August 30 | 05:30 PM
15 0 0
Share this story

चटपटे मोती
सण-वारांच्या दिवसांत घरात सतत गोड पदार्थ होत असतात. त्यातही गौरी-गणपतीच्या काळात मोदक बनवले जातातच. तळणीचे मोदक, उकडीचे मोदक असे प्रकारही पाहायला मिळतात. उकडीच्या मोदकांसाठी लागणारा महत्त्वाचा घटक म्हणजे तांदळाची पिठी. याच तांदळाच्या पिठीपासून चटपटे मोती नावाचा एक वेगळा पदार्थही तयार करता येतो. ‘पौष्टिक डब्याची चविष्ट रेसिपी’ या सदरात या वेळी पाहू या त्याच पदार्थाची रेसिपी...
...................
तांदूळ पिठीश्री गणरायांच्या आगमनामुळे घरोघरी खूप उत्साहाचे वातावरण आहे. या काळात घरात रोज वेगवेगळे प्रसाद असतात. त्यातही उकडीच्या मोदकांचा नैवेद्य विशेष असतो. त्यासाठी लागणारी तांदूळ पिठी सध्या घरामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. त्याच तांदूळपिठीचा एक नवीन पदार्थ आज पाहणार आहोत. हा पदार्थ थोडा वेळखाऊ असला तरीही  पूर्वतयारी केलेली असल्यास दुसऱ्या दिवशी पटकन करता येण्यासारखा आहे. शिवाय त्यासाठी साहित्यसुद्धा खूप वेगळे लागत नाही. पोटभरीचा व दिसायलाही छान असा हा पदार्थ आहे. हे चटपटीत मोती मुलांना नक्कीच आवडतील.

साहित्य :    
तांदूळ पिठी - एक वाटी, पाणी - एक वाटी, कढीपत्ता, कोथिंबीर, एक चमचा तेल, एक मिरची व एक इंच आल्याच्या तुकड्याची पेस्ट, एक टेबल स्पून तेल, मोहरी, जिरे, हिंग, चवीपुरते मीठ, एक चमचा आंब्याच्या लोणच्याचा मसाला.


कृती :
- प्रथम जाड बुडाच्या पातेल्यात पाणी घ्या.
- त्यात तेल व मीठ घाला आणि उकळी येऊ द्या.
- नंतर त्यात तांदूळपिठी घालून एकसारखे हलवून त्याची उकड करून घ्या.
- त्यात वाटलेली मिरची व आले घाला.
- गॅस बंद करून जरा वेळ झाकण ठेवा.
- आता उकड छान मळून गोळा बनवा व त्या गोळ्याचे पोळपाटावर लांब रोल करून घ्या.
- या गोळ्याला तेलाचा हात लावून छोटे-छोटे गोळे म्हणजेच मोती करून ठेवून द्या.
- पदार्थ नंतर करायचा असल्यास हे मोती फ्रीजमध्ये बंद डब्यात ठेवा. 
- एका कढईत तेल, मोहरी, जिरे, हिंग, व कढीपत्ता घालून खमंग फोडणी करा. 
- आता हे छोटे मोती त्यात टाकून हलक्या हाताने फोडणीत घोळा.
- दोन मिनिटांनी गॅस बंद करून ते सर्व्ह करा. आंब्याच्या लोणच्याचा मसाला व कोथिंबिरीने सजवा.
- पांढरे मोती, त्यावर लालबुंद मसाला व हिरवी कोथिंबीर हे खूपच आकर्षक दिसते व चविष्टही लागते.
- मुलांना हा पदार्थ डब्यातही देता येतो.

- आश्लेषा भागवत
मोबाइल : ९४२३० ०८८६८
ई-मेल : ashlesha0605@gmail.com

(लेखिका पुण्यातील आहारतज्ज्ञ आहेत.)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
shilpa kulkarni About
wa mast
0
0

Select Language
Share Link