Next
पुण्यात वुमन्स सर्जरी क्लिनिक सुरू
प्रेस रिलीज
Friday, June 22, 2018 | 04:28 PM
15 0 0
Share this article:पुणे : सह्याद्री हॉस्पिटल्सतर्फे इवा क्लिनिक हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. इवा हे अनोखे ऑल वुमन्स सर्जरी क्लिनिक संपूर्णतः सर्वसमावेशक सल्ला आणि गरज असल्यास महिलांसाठी विशेष महिला सर्जन्समार्फत शस्त्रक्रिया सेवा यांसाठी समर्पित असेल.​

हे क्लिनिक सह्याद्री हॉस्पिटल्सच्या डेक्कन, नगर रोड, हडपसर, बिबवेवाडी व कोथरूड येथे कार्यान्वित करण्यात आले असून, याचे उद्घाटन नगर रोड येथे महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, सह्याद्री हॉस्पिटल्सच्या कार्यकारी संचालिका डॉ. जयश्री आपटे, ओबेसिटी तज्ञ व सह्याद्री हॉस्पिटल्स व जेटी ओबेसिटी सोल्युशन्सच्या-ओ क्लिनिकच्या संचालिका डॉ. जयश्री तोडकर, इंडियन मेडिकल असोसिएशन पुणेच्या (आयएमए) अध्यक्ष डॉ. पदमा अय्यर, माजी अध्यक्ष डॉ. माया तुळपुळे, सह्याद्री हॉस्पिटल्स समुहाचे सीओओ डॉ. सुनील राव आदी उपस्थित होते.

इवा हे वुमन्स सर्जरी क्लिनिक प्रत्येक सोमवार, गुरुवार  आणि शनिवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत डेक्कन जिमखाना, नगर रस्ता, हडपसर, कोथरूड, बिबवेवाडी येथे खुले असणार आहे. या क्लिनिकमधील विशेष सुविधांमध्ये समर्पित आणि प्रशिक्षित असलेल्या तज्ज्ञ महिला सर्जन्स, सर्वसमावेशक सल्ला सुविधा, शस्त्रक्रियेसाठी विशेष पॅकेजेस, उत्तम सुविधा असलेले क्लिनिक याअंतर्गत ब्रेस्ट क्लिनिक, प्रोक्टोलॉजी क्लिनिक (मूळव्याध, फिशर्स, भगंदर (फिस्तुला), हेमोरॉइड्स, गुदद्वारासंबंधीत रक्तस्रावासाठी उपचार), डायजेस्टिव्ह डिसऑर्डर्स क्लिनिक (यकृत संबंधित रोगांसाठी आणि सर्व प्रकारच्या पचन संस्थेसंबंधी, तसेच गॉल ब्लॅडर स्टोन आणि पॅनक्रियाटिक स्टोन्ससाठीच्या शस्त्रक्रिया), हर्निया क्लिनिक (सर्व प्रकारच्या हर्नियावरील शस्त्रक्रियेसाठी), सहाय्यक सुविधा जसे की फिजिओथेरेपी आणि आहारविषयक सल्ला यांचा समावेश असणार आहे.

या इवा क्लिनिक टीममध्ये जनरल व लॅप्रोस्कोपिक सर्जन्स डॉ. जयश्री तोडकर, डॉ. प्रीती रॉजर, डॉ. शिल्पा नाईक, डॉ. अनघा वडगावकर, डॉ. क्षमा शेख, डॉ. गौरी सिंग आणि डॉ. सुहासिनी जाधव यांचा समावेश आहे.

या प्रसंगी बोलताना महापौर टिळक म्हणाल्या, ‘बरेचदा महिला आरोग्याविषयीच्या समस्या सांगायला संकोच करतात व डॉक्टरांकडे जात नाहीत आणि नंतर आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. त्यामुळे इवा ही महिलांपर्यंत पोहचण्याची संकल्पना कौतुकास्पद आहे. याचा लाभ पुण्यातील सर्व स्तरातील महिलांना होईल. ज्या महिलांना उपचार परवडणार नाहीत, त्यांच्यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या शहरी गरीब वैद्यकीय योजनेबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. या संकल्पनेमध्ये सल्ला व समुपदेशन हे महत्त्वाचे घटक ठरतील.’

पोलिस आयुक्त शुक्ला म्हणाल्या, ‘बरेच वेळा महिलांचे आरोग्य हे गृहित धरले जाते. असे न करता महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असून, त्याची सुरूवात आपल्या घरापासून झाली पहिजे.’

डॉ. आपटे म्हणाल्या, ‘सह्याद्री हॉस्पिटलने आरोग्य क्षेत्रात नेहमीच एक पाऊल पुढे राहून नवीन उपक्रम सुरू केले आहेत. या अनोख्या इवा उपक्रमामुळे महिलांना आपल्या आरोग्यविषयक समस्या विनासंकोच सांगता येणार आहेत. सर्व सह्याद्री हॉस्पिटल्समध्ये हे क्लिनिक उपलब्ध झाल्याने सर्व महिलांना सोईस्कर ठरणार आहे.

क्लिनिकच्या संचालिका आणि बॅरियाट्रिक सर्जन डॉ. तोडकर म्हणाल्या, ‘इवा ही संकल्पना अद्वितीय असून, यामध्ये सात महिला शल्यविशारद महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता पसरविण्याच्या तत्त्वावर काम करतील. महिलांनी आपल्या आरोग्यविषयक समस्या कुठलाही संकोच न करता डॉक्टरांना सांगाव्यात या हेतूने हे क्लिनिक आम्ही सुरू करत आहोत. महिलांमध्ये आरोग्यसेवा पुरवठा करण्याची पूर्ण क्षमता आहे, हे देखील या उपक्रमातून अधोरेखित होईल.’

उद्घाटनाचा भाग म्हणून सह्याद्री हॉस्पिटल्सतर्फे २० जून ते २० जुलै २०१८ पर्यंत महिलांसाठी खास तपासणी शिबिरे घेतली जाणार आहेत. यामध्ये पॅथोलॉजी लॅबमधील तपासण्यांवर २५ टक्के सवलत दिली जाणार आहे; तसेच शस्त्रक्रियेचा सल्ला दिला असेल, तर त्यावरही खास सवलत दिली जाणार आहे. पोटात जळजळ, पित्त, बद्धकोष्ठता, पोटात दुखणे, मल विसर्जनादरम्यान रक्त पडणे, सतत उलट्या, हर्निया, मूळव्याध, फिशर्स, भगंदर (फिस्तुला), स्तनातील गाठ आणि गॉल ब्लॅडर स्टोन, बाइल डक्ट, पॅनक्रियाज या समस्यांवर सल्ला आणि उपचारांसाठी या क्लिनिकमधल्या महिला सर्जन्सना भेट देता येईल.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search