Next
गुणांकित सावरकर
BOI
Sunday, May 28, 2017 | 06:00 AM
15 1 0
Share this article:

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज, २८ मे रोजी जयंती आहे. सावरकरांनी आयुष्यभर आपले क्रांतिकारी विचार मांडले, ते अंमलात आणले आणि शेवटच्या श्वासापर्यंत मातृभूमीसाठी कार्य केले. अत्यंत प्रखर देशभक्त असलेल्या सावरकरांनी आपल्या प्रभावी लेखनातूनही देशवासीयांना दिशा दाखवली, प्रेरणा दिली. त्यांच्या जयंतीनिमित्त, अनघा मोडक हिचे स्वातंत्र्यवीरांवरील व्याख्यान आपल्यासमोर सादर करत आहोत. 

अनघा मोडक ही मुंबईतील तरुण निवेदिका आणि व्याख्याती असून, वयाच्या पंचविसाव्या वर्षी अचानक दृष्टी जाऊनही न खचता तिने स्वतःच्या आवडीच्या निवेदन व व्याख्यानाच्या क्षेत्रात करिअर करायचे ठरवले आणि त्या दिशेने प्रत्यक्ष वाटचालही सुरू केली. तिच्या जिद्दीला सलाम करण्यासाठी पुण्यातील हिंदू महिला सभेने तिला १० मे २०१७ रोजी ज्योतिर्मयी पुरस्कार देऊन गौरवले. त्या वेळी तिने केलेले ‘गुणांकित सावरकर’ या विषयावरील ओघवते व्याख्यान आपल्याला येथे ऐकता येईल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विविध गुणवैशिष्ट्यांचा आढावा तिने या व्याख्यानात घेतला आहे. गायिका रमा कुळकर्णी यांनी या व्याख्यानात सावकरांची काही गीतेही सादर केली आहेत. वेबसाइट्स :
http://www.savarkarsmarak.com/ आणि http://www.savarkar.org/ या दोन वेबसाइट्सवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती असून, त्यांची पुस्तके, ऑडिओ, व्हिडिओ अशा सर्व साहित्याचे एकत्रीकरणही करण्यात आले आहे. सावकरांबद्दल यू-ट्यूबवर उपलब्ध असलेले व्हिडिओज पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

सावरकरांची ई-बुक्स मोफत
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्टतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या समग्र साहित्यापैकी बहुतांश पुस्तके ई-बुक स्वरूपात बुकगंगा डॉट कॉम या पोर्टलवर मोफत उपलब्ध आहेत. ती डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. बुकगंगाच्या मोबाइल अॅप्लिकेशनवरूनही ती डाउनलोड करता येतील.  
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 49 Days ago
He used to write in the Marathi periodical -- Kirloskar -- , on social issues . That was in about 1936 . I wonder whether they have been collected and published in the form a book .
0
0
BDGramopadhye About 51 Days ago
His thoughts on Hinduism as practised , are similar to those of Vivekanand , Agararakar and Dabholakar . Habits / traditions die hard . In the long run , that is his real contribution to the evolution of our society .
0
0
Bal Gramopadhye About 95 Days ago
How did he come to conclude that armed resistance was the effective Way to independence ? To most people , independence meant Nothing . Reliable , stable administration , was what mattered . Could he not see that ?
0
0

Select Language
Share Link
 
Search