Next
‘पुणे ऑफ्थॅलमोलॉजिकल सोसायटी’तर्फे राष्ट्रीय परिषद
प्रेस रिलीज
Thursday, December 06, 2018 | 04:47 PM
15 0 0
Share this article:

पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉ. नितीन प्रभुदेसाई. शेजारी डावीकडून डॉ. मोनिका नाईक-निंबाळकर, डॉ. अपर्णा वैद्य, डॉ. संजय शहा आणि डॉ. मेधा प्रभुदेसाई.

पुणे : ‘पुणे ऑफ्थॅलमोलॉजिकल सोसायटीतर्फे व महाराष्ट्र ऑफ्थॅलमोलॉजिकल सोसायटीच्या सहकार्याने ‘इनसाइट २०१८’ ही अकरावी वार्षिक राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. सात, आठ आणि नऊ डिसेंबर या कालावधीत हॉटेल ग्रँड शेरटन येथे होणार असून, यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ३० नेत्रतज्ञ उपस्थित राहणार आहेत; तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रख्यात तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत,’ अशी माहिती पुणे ऑफ्थॅलमोलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन प्रभुदेसाई यांनी दिली.

या वेळी सचिव डॉ. अपर्णा वैद्य, खजिनदार डॉ. मोनिका नाईक-निंबाळकर, परिषदेचे समन्वयक डॉ. संजय शहा उपस्थित होते. या परिषदेत मोतीबिंदू, नेत्रपटल, रिफ्रॅक्टीव्ह, दृष्टीपटल (रेटिना), युव्हीईए, ऑक्युलोप्लास्टी, ग्लाऊकोमा, आयएसएमएसआयसीएस या विषयांवर तज्ञांचा परिसंवाद होणार आहे.

डॉ. प्रभुदेसाई म्हणाले, ‘यावर्षी परिषदेचा भर तंत्रज्ञानामध्ये होत असलेली नवीन प्रगती व त्याचा दैनंदिन कामकाजात वापर कसा करावा यावर असणार आहे. सर्जिकल स्कील ट्रान्सफर कोर्स प्रतिनिधींना तज्ञांबरोबर संवाद साधण्यास आणि आपले कौशल्य सुधारण्यास मदत करेल; तसेच या परिषदेमध्ये आम्ही आमच्या सदस्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करणार आहोत.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search