Next
पुणे विद्यार्थी गृहाचा १०९वा वर्धापन दिन साजरा
प्रेस रिलीज
Wednesday, May 16 | 01:01 PM
15 0 0
Share this story



पुणे : समाजातील गरीब, गरजू व अनाथ विद्यार्थ्यांचा आधारवड असलेल्या पुणे विद्यार्थी गृहाचा १०९वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही या वेळी उपस्थिती लावली. संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांनी संस्था पदाधिकारी व संचालकांना भावी वाटचालीस शुभेच्या दिल्या.

संस्थेच्या आवारातील श्रीराम मंदिरात १९६६ आणि १९६७ मॅट्रीक बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम म. को. वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झाला. निवृत्त शिक्षक मुकुंद उपासनी यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान व सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थी महामंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंडळातर्फे देण्यात येणारे चार पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रसेनजीत फडणवीस यांच्या हस्ते संस्थेतील विविध शिक्षकांना देण्यात आले.

प्रसंगी संस्थेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष प्राचार्य श्री. अ. पाटणकर, सदस्या पूर्णिमा लिखिते, संस्थेचे कार्याध्यक्ष सुभाष जिर्गे, कार्यवाह प्रा. राजेंद्र कांबळे, कोषाध्यक्ष राजेंद्र बोर्‍हाडे, कुलसचिव सुनील रेडेकर व पुणे, मुंबई व नाशिक येथील सर्व संचालक उपस्थित होते. संस्थेच्या विविध शाळा, महाविद्यालये व इतर सर्व विभागांचे विभागप्रमुख, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर सेवक आणि वसतिगृहाचे रेक्टर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हितचिंतक, देणगीदार, माजी विद्यार्थी, संस्थेचे चार्टर्ड अकौंटंट, कायदे सल्लागार, समाजातील विविध प्रतिष्ठित मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, आजी माजी विद्यार्थी व संचालक उपस्थित होते. या प्रसंगी अनेक माजी विद्यार्थी व देणगीदारांनी संस्थेस देणग्या दिल्या.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link