Next
किशनचंद फेरवानी यांना मरणोत्तर ‘सिंधुरत्न’ पुरस्कार
BOI
Monday, April 15, 2019 | 04:48 PM
15 0 0
Share this article:

किशनचंद फेरवानी यांना मरणोत्तर ‘सिंधुरत्न २०१९’ पुरस्कार देण्यात आला. त्यांचे पुत्र दिनेश फेरवानी, रवी फेरवानी, सुधीर फेरवानी आणि बंधू मनोहर फेरवानी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

पुणे : समाजसेवक, यशस्वी उद्योजक, उत्तम वक्ते आणि संसद भवनात हेमू कलानी यांचा पुतळा उभारण्यासाठी देणगी देणारे किशनचंद फेरवानी यांना भारतीय सिंधू सभा, पुणे यांच्यातर्फे मरणोत्तर ‘सिंधुरत्न २०१९’  पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

किशनचंद फेरवानी
भारतीय सिंधू सभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुरेश हेमनानी आणि पुणे शाखेचे अध्यक्ष ग्यान पंजाबी यांच्या हस्ते नुकतेच या पुरस्काराचे वितरण झाले. किशनचंद फेरवानी यांच्या वतीने त्यांचे पुत्र दिनेश फेरवानी, रवी फेरवानी, सुधीर फेरवानी आणि बंधू मनोहर फेरवानी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. शाल, श्रीफळ, मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. 

सिंधी समाजातील एक दानशूर व्यक्ती म्हणून किशनचंद फेरवानी यांची ओळख होती. भारतीय सिंधू सभेच्या स्थापनेपासून ते सामाजिक कार्यात सक्रिय होते. संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवले. बी. टी. अडवाणी सिंधी धर्मशाळा बांधण्यात त्यांचा मोठा वाटा होता. यासह अनाथ, गोरगरिबांना मदत करण्यात त्यांचा पुढाकार असे. त्यांच्या निधनानंतर १५ वर्षांनी त्यांना सन्मानित करून, त्यांनी केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न भारतीय सिंधू सभेने केला आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search