Next
‘स्टार प्रवाह’वर ‘संस्कृती कला दर्पण’ सोहळा १० जूनला
प्रेस रिलीज
Wednesday, June 06 | 05:20 PM
15 0 0
Share this story

मुंबई : मराठी नाटक, चित्रपट, टीव्ही मालिकांतील सर्वोत्कृष्ट कलाकृती आणि सेलिब्रेटींचे धमाल परफॉर्मन्सेस असलेला संस्कृती कला दर्पण पुरस्कार सोहळा ‘स्टार प्रवाह’वर १० जूनला दुपारी एक आणि संध्याकाळी सात वाजता पाहता येणार आहे.

अर्चना नेवरेकर फाउंडेशनतर्फे आयोजित संस्कृती कला दर्पण सोहळ्यात यंदाही चित्रपट, नाटक आणि टीव्ही मालिका क्षेत्रातील सर्वोत्तम कलाकृतींचा सन्मान करण्यात आला. मराठी मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर कलाकारांची मांदियाळी या सोहळ्याला लोटली होती. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांना कलागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मराठी मनोरंजन क्षेत्राकडून मिळालेला हा पुरस्कार स्वीकारताना ते भावूक झाले होते.

सई देवधर, गश्मीर महाजनी आणि मानसी नाईकच्या दमदार परफॉर्मन्सने या सोहळ्याची रंगत आणखी वाढवली. ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकांतील कलाकारांनीही लक्षवेधी नृत्याविष्कार केला. ज्ञानदा रामतीर्थकर, गौरव घाटणेकर, अजिंक्य राऊत, सायली देवधर, विकास पाटील, हरीश दुधाडे, अक्षर कोठारी, ऐतशा संझगिरी, रूपल नंद, समीर परांजपे यांच्या परफॉर्मन्सचा धमाका झाला. त्याचबरोबर अभिनेता स्वप्नील जोशी यानेही दणक्यात सादरीकरण केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link