Next
‘रुबी हॉल क्लिनिक’तर्फे कॅन्सर मॅनेजमेंट कोर्स
प्रेस रिलीज
Thursday, July 11, 2019 | 04:56 PM
15 0 0
Share this article:


पुणे : रुबी हॉल क्लिनिकतर्फे प्राथमिक देखभाल चिकित्सकांसाठी (प्रायमरी केअर फिजियन्स) १३व्या कॅन्सर मॅनेजमेंट शॉर्ट सर्टिफिकेट कोर्सचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. 

या उपक्रमाचे उद्घाटन रूबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त डॉ. परवेझ ग्रांट, ‘रुबी’च्या लॅबोरेटरी विभागाच्या संचालिका डॉ. नीता मुन्शी, कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष डॉ. अशोक भणगे, आयोजन सचिव डॉ. भूषण झाडे, सर्जिकल आँकोलॉजी विभागाचे अध्यक्ष डॉ. संजय देशमुख, ‘रुबी’चे मुख्य कामकाज अधिकारी डॉ. किशोर पुजारी, ‘रुबी’चे वैद्यकीय संचालक डॉ. संजय पठारे, नर्सिंग सर्व्हिसेसच्या संचालिका लेफ्टनंट कर्नल सिसी क्रुझ, मेडिकल आँकोलॉजी विभागाचे संचालक डॉ. मिनिष जैन आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

या परिषदेमध्ये वैद्यकीय कार्यक्रमांची सत्रे आयोजित करण्यात आली होती. यात ब्रेन ट्युमर, सीएनएस, हेड अ‍ॅंड नेक, गायनॅक, जेनेटिक्स सेशन, थोरॅसिक, गॅस्ट्रो इंटेस्टिनल आणि जेनीटोयुरीनरी कॅन्सर या विषयांचा समावेश होता. या उपक्रमात २००हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. 


या प्रसंगी बोलताना कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष डॉ. भणगे म्हणाले, ‘गेल्या १२ वर्षांपासून रुबी हॉल कॅन्सर सेंटर टीमतर्फे या ‘कॅन्सर मॅनेजमेंट- बेसिक्स इन कॅन्सर पेशंट केअर कोर्स’चे आयोजन कॅन्सर पेशंट मॅनेजमेंटसंबंधी विस्तृत महिती पुरविण्याच्या दृष्टीकोनातून केले जात आहे. या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रभरातील आँकोलॉजी तज्ज्ञांच्या नेहमीच्या व्याख्यानांचे स्वरूप बदलून त्याचे चर्चासत्रांमध्ये रूपांतर झाले आहे.’

आयोजन सचिव डॉ. भूषण झाडे म्हणाले, ‘आजच्या जगात कॅन्सर केअर मॅनेजमेंटसाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. हे करत असताना आम्हाला प्राथमिक देखभाल चिकित्सकांच्या सहकार्याची गरज आहे, जेणेकरून हे ज्ञान रुग्णांच्या देखभालीसाठी प्रत्येक पातळीवर पोहचू शकेल.’

या पुढाकाराबद्दल बोलताना सर्जिकल आँकोलॉजी विभागाचे अध्यक्ष डॉ. देशमुख म्हणाले, ‘कर्करोगाचे प्रमाण वाढत असण्याच्या सध्याच्या काळात प्राथमिक देखभाल चिकित्सकांना मुलभूत कर्करोग निदान आणि रुग्णांची देखभाल यासंबंधी वैद्यकीय माहिती देऊन सक्षम बनविण्याची गरज आहे. हा उपक्रम म्हणजे या मार्गावर पुढे जाण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे.’


‘रुबी’चे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. ग्रांट म्हणाले, ‘कर्करोग ही भारतात मोठी समस्या बनत चालली आहे आणि दिवसेंदिवस कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. १० ते १५ वर्षांपूर्वी ‘रुबी’मधील कार्डिओलॉजीवर सर्वाधिक भर दिला जायचा; मात्र आता कर्करोगाची समस्या वाढत असल्यामुळे त्याच्याशी संबंधित साधने व वित्तसासाह्य यांवर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. कॅन्सरशी निगडीत अद्ययावत उपकरणे आम्ही रुबी हॉल क्लिनिकमध्ये स्थापित करीत आहोत.’

कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर ‘कर्करोग उपचार’ यावर चर्चासत्र झाले. यात सर्जिकल आँकोलॉजी विभागाचे अध्यक्ष डॉ. देशमुख, ‘रुबी’चे मुख्य कामकाज अधिकारी डॉ. पुजारी, ‘रुबी’चे वैद्यकीय संचालक डॉ. पठारे, नर्सिंग सर्व्हिसेसच्या संचालिका लेफ्टनंट कर्नल सिसी क्रुझ, ‘रुबी’चे उपसरव्यवस्थापक पुरुषोत्तम पागेदार, सामाजिक कार्यकर्ते सुदिन आपटे, कॅन्सरमधून बचावलेल्या सोनिया वॉटसन आणि वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या आरती गोखले यांनी सहभाग घेतला होता.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search