Next
इंटरनेट युझर्स होणार ७३ कोटी
BOI
Wednesday, March 29, 2017 | 06:45 PM
15 0 0
Share this article:

नवी दिल्ली : ‘डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे देशातील इंटरनेट युझर्सच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे,’ अशी माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी दिली. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण, अर्थात ‘ट्राय’ने दिलेल्या माहितीनुसार, २०१६पर्यंत देशभरात सुमारे ३९.१० कोटी नागरिक इंटरनेटचा वापर करत होते. २०२०पर्यंत ही संख्या ७३ कोटींवर जाईल, असा अंदाज ‘नॅसकॉम’ या सॉफ्टवेअर सेवा कंपन्यांच्या संघटनेने व्यक्त केला आहे. २०२०पर्यंत ६० कोटी ब्रॉडबँड जोडण्या दिल्या जातील, असेही ‘नॅसकॉम’ने म्हटले आहे. 

विविध दूरसंचार कंपन्यांना सेवा पुरवण्यासाठी सरकारने ऑक्टोबर २०१६मध्ये ९६५ मेगाहर्ट्झचा स्पेक्ट्रम वितरित केला आहे. यामुळे थ्री जी आणि फोर जी सेवा ग्राहकाला पुरवणे शक्य होणार आहे. त्याशिवाय ग्रामीण भागात ब्रॉडबँड जाळे विस्तारण्यासाठी सरकारने भारतनेट हा प्रकल्प हाती घेतला असून, त्याअंतर्गत ग्रामपंचायती फायबर नेटने जोडल्या जात आहेत. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search