Next
निरोगी शरीर, मनासाठी दररोज आयोडिनयुक्त मीठ
जागतिक आयोडिन कमतरता दिनाचा संकल्प
प्रेस रिलीज
Monday, October 22, 2018 | 03:34 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : आयोडिनच्या कमतरतेमुळे अनेकविध आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. चिमूटभर आयोडिनयुक्त मीठ आपल्याला मेंदूच्या टाळता येण्याजोग्या आजारांपासून सुरक्षित ठेवू शकते. हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जागतिक आयोडिन कमतरता दिनानिमित्त टाटा सॉल्ट कंपनीने जागरूकता मोहीम हाती घेतली आहे. यानिमित्त  निरोगी शरीर, मनासाठी दररोज आयोडिनयुक्त मीठ घेण्याचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 दर वर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस जागतिक आयोडिन कमतरता दिवस म्हणून पाळला जातो.  ‘The Missing I’ या कल्पक उपक्रमाच्या माध्यमातून आयोडिनचे महत्त्व प्रस्थापित करण्यासाठी, तसेच त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा ब्रॅंड पारंपरिक, तसेच नवीन युगातील माध्यमांचा उपयोग करत आहे.

आयोडिनच्या कमतरतेमुळे अनेकविध आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. यामध्ये गलगंड, हायपोथायरॉइडिझम, गर्भपात, मृत अर्भक जन्माला येणे, जन्मजात दोष, अर्भक, तसेच नवजात अर्भकांचा मृत्यू होणे आणि वाढीत अडथळे निर्माण होणे यांचा समावेश आहे. टाळता येण्याजोग्या मतिमंदत्वामागे आयोडिनची कमतरता हे प्रमुख कारण आहे. मेंदू विकसित होत असताना आयोडिनची कमतरता निर्माण झाल्यास कधीच सुधारले जाणार नाहीत, असे दोष निर्माण होतात. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात किंवा बालपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आयोडिनची कमतरता निर्माण होणे अधिक धोकादायक असते. यामुळे अनेक प्रकारचे मानसिक आजार होऊ शकतात; तसेच बौद्धिक क्षमतेचा ऱ्हास होऊ शकतो. 

मीठ हा सुक्ष्मपोषकांचा प्रभावी वाहक समजला जातो. म्हणूनच आहारामध्ये महत्त्वाच्या पोषकांचा समावेश करण्यासाठी आहारातील मीठ आयोडिनयुक्त करणे हा सर्वांत सोपा उपाय आहे. आयोडिनचा पुरेसा समावेश असलेल्या मिठाचा घरांमधील वापर २००० मध्ये ५५ टक्के होता. केंद्र तसेच राज्य सरकारे, आयोडिनयुक्त मीठ उत्पादक, स्वयंसेवी संस्था, द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय एजन्सीज आदींच्या सहयोगाने आयोडिन ग्लोबल नेटवर्कने केलेल्या प्रयत्नांमुळे तो २०१७ मध्ये ८७ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

एआयआयएमएस नवी दिल्लीचे माजी विद्यार्थी, तसेच सध्या पोषण अभियानाखालील भारतातील पोषणविषयक आव्हानांबाबतच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य डॉ. चंद्रकांत एस. पांडव म्हणाले, ‘आपल्या निरोगी राष्ट्राच्या दिशेने चाललेल्या प्रवासात चिमूटभर आयोडिनयुक्त मीठ आपल्याला मेंदूच्या टाळता येण्याजोग्या आजारांपासून सुरक्षित ठेवू शकते. आयडीडीच्या निर्मूलनासाठी युनिव्हर्सल सॉल्ट आयोडायझेशन हे डब्ल्यूएचओचे उच्चप्राधान्य धोरण आहे. यामुळे दरवर्षी जगभरातील मुलांमधील १.५ बिलियन आयक्यू पॉइंट्स (बुद्ध्यांक गुण) वाचवले जात आहेत. निरोगी शरीर व मनासाठी दररोज आयोडिनयुक्त मीठ घेण्याचा संकल्प आपण एक राष्ट्र म्हणून करूया.’

टाटा केमिकल्स लिमिटेडच्या ग्राहक उत्पादन व्यवसाय विभागाच्या सीओओ रिचा अरोरा म्हणाल्या, ‘राष्ट्राला आयोडिन कमतरतेमुळे होणाऱ्या आजारांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच भारताला निरोगी करण्यासाठी संप्रेरकाची भूमिका बजावण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. भारतातील पहिले ब्रॅंडेड आयोडिनयुक्त मीठ तयार करून टाटा सॉल्टने आयोडिनीकरणाच्या चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. टाटा सॉल्टचा जन्म देशाची गरज भागवण्यासाठी झाला आणि आजही आम्ही ‘देश की सेहत, देश का नमक’ हे आपले घोषवाक्य खरे ठरवत आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. सुक्ष्मपोषकांच्या कमतरतांचा सामना करण्यासाठी आरोग्यपूर्ण मीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या अनेकविध उत्पादनांच्या माध्यमातून करत आहोत.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search