Next
‘प्लेक्सकॉन्सिल’तर्फे उत्कृष्ट निर्यातदारांचा गौरव
प्रेस रिलीज
Wednesday, July 25, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this article:मुंबई : दी प्लास्टिक एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलतर्फे (प्लेक्सकॉन्सिल) आर्थिक वर्ष २०१६ (२०१५-१६) आणि २०१७ या वर्षांसाठी उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या निर्यातदारांचा ‘कौन्सिल पुरस्कारा’ने गौरव केला. नुकत्याच आयोजित या सोहळ्यात महाराष्ट्राचे उद्योग आणि खाणमंत्री सुभाष देसाई आणि भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सहसचिव श्यामल मिश्रा यांची उपस्थिती होती.

२०१७-२०१८ या आर्थिक वर्षात भारताच्या प्लास्टिक निर्यातीत १७.१ टक्क्यांची वाढ होऊन ती ८.८५ अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात ७.५६ अब्ज अमेरिकन डॉलर्सची निर्यात नोंदवली गेली होती. या सोहळ्यात उद्योग आणि खाणकाममंत्री देसाई यांनी प्लास्टिक उद्योगासाठी विशेष क्लस्टर, आरएनडी सेंटर आणि सामायिकीकरण सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सहसचिव मिश्रा यांनी जगभरातील विद्यमान आणि नव्या बाजारपेठेतील आपले अस्तित्त्व वाढविण्याचे आवाहन केले.

या वेळी ‘प्लेक्सकॉन्सिल’चे अध्यक्ष ए. के. बसाक, माजी अध्यक्ष प्रदीप ठक्कर, प्लेक्सकॉन्सिल ईडी श्रीबाश दासमोहपात्रा आणि ‘प्लेक्सकॉन्सिल’चे दक्षिण क्षेत्रीय अध्यक्ष रविश कामथ हे व्यासपीठावर उपस्थित होते.

पुरस्कार विजेत्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लि., गरवारे वॉल रोप्स लि., गरवारे पॉलिस्टर लि., सुप्रीम इंडस्ट्रीज लि., ग्रीनलॅम इंडस्ट्रीज लि., जैन इरिगेशन सिस्टीम्स लि., मेरिनो इंडस्ट्रीज लि., पॉलिप्लेक्स कॉर्पोरेशन लि., फ्लेक्सिटफ इंटरनॅशनल लि., व्हॅकमेट इंडिया लि., सीआरआय लि., प्रायमा प्लास्टिक्स लि., शीला फोम प्रा. लि., कॉन्डोर फूटवेअर (इंडिया) लि., नॅशनल प्लास्टिक इंडस्ट्रीज लि., पॉली मेडिक्युअर लि., आयव्हाएल धनसेरी पेट्रोकेम इंडस्ट्रीज प्रा. लि., टोकिया प्लास्ट इंटरनॅशनल लि., प्रिन्स कॉर्प., जिलेट डायव्हर्सिफाईड ऑपरेशन्स (पी) लि., भीम पॉलिफॅब इंडस्ट्रीज, फ्लेअर रायटिंग इंडस्ट्रीज लि. आणि लिंक पेन अॅंड प्लास्टिक्स लि. यांचा समावेश आहे.

या वेळी उद्योग मंत्री देसाई म्हणाले, ‘प्लेक्सकॉन्सिलच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहताना मला खूप आनंद होत आहे. एक उद्योग म्हणून प्लास्टिक हे राहणार असून, अर्थव्यवस्थेमध्ये प्लास्टिक व्यवसाय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. हा उद्योग आपल्या देशासाठी रोजगारनिर्मितीबरोबरच संपत्तीही उपलब्ध करीत आहे. जागतिक व्यापारात आपला हिस्सा खूप लहान आहे आणि जागतिक निर्यातीमधील आपला प्रभाव आणखी वाढविण्याचा भारताचा प्रयत्न आहे. प्लास्टिक एक असा उद्योग आहे, ज्याद्वारे आपण जगातील निर्यात वाढवू शकतो. तंत्रज्ञान आणि उद्योजकता तसेच संशोधन आणि विकासासाठी महाराष्ट्र शासनाने ‘सीपीईटी’सारखे अनेक उपक्रम राबविले आहेत.’

‘महाराष्ट्र राज्यात १० टेक्स्टाइल पार्क आणि संरक्षण उत्पादनाचे पाच प्रकल्प उभारण्याची योजना आम्ही जाहीर केली आहे. प्लास्टिक उद्योगासाठी स्वतंत्र क्लस्टर निर्माण करण्याचा आम्ही गांभीर्याने विचार करीत असून, सर्व प्रकारच्या प्लास्टिक उत्पादक आणि निर्यातदारांसाठी तिथे सुविधांची सामायिक केंद्रे असतील आणि त्यांना त्या सुविधा उपलब्ध होऊ शकतील. कौन्सिलच्या मदतीने प्लास्टिक उद्योगातील मोठ्या, मध्यम आणि लघु कंपन्यांसाठी भूखंड आरक्षित करू शकतो. प्लास्टिक उद्योगासाठी आम्हाला आरएनडी केंद्रे उभारायची आहेत. प्लास्टिकच्या पुनर्वापरासंबंधी नाविन्यपूर्ण सृजनात्मक कल्पनांचा विचार करावा, असे मी कौन्सिल आणि प्रमुख उद्योगांना आवाहन करतो. उद्योग सुलभतेच्या बाबतीत महाराष्ट्राच्या क्रमवारीत घट झाल्याने आम्ही तातडीने सुधारणा केल्या आणि ‘मैत्री’ नावाचे सामायिक सुविधांचे माध्यम सुरू केले. व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी १८ विविध विभागांनी एकत्र येऊन ही एक खिडकी सुविधा उपलब्ध केली. व्यवसाय सुलभतेच्या बाबतीत महाराष्ट्र पुन्हा अग्रगण्य स्थान मिळवेल, असा आम्हाला विश्वास आहे,’ असे देसाई यांनी सांगितले.

भारत सरकारच्या केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सहसचिव मिश्रा म्हणाले, ‘दर्जा आणि विश्वासार्हतेवर भर देऊन प्लास्टिक निर्यात वाढविण्यासाठी अत्यंत प्रयत्नशील असलेल्या निर्यातदारांचे मी या सोहळ्याच्या निमित्ताने अभिनंदन करतो. निर्यातवाढीच्या दृष्टीने भविष्यात काय पावले उचलता येतील, याबाबत चर्चा आणि आत्मपरीक्षण करण्यासाठी ही संघटना उद्योगासाठी एक व्यासपीठ तयार करेल, अशी मला आशा आहे. भारताच्या प्लास्टिक निर्यातीने २०१७-१८ या वर्षात १७.१ टक्क्यांची वाढ नोंदवत ती ८.८५ अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली आहे. तुलनेत २०१६-१७मध्ये ७.५६ अब्ज अमेरिकन डॉलर्सची निर्यात झाली होती. एकूण व्यापारी मालाच्या निर्यातीमध्ये ही सर्वाधिक गतीने झालेली वाढ आहे.’

‘एक उद्योग म्हणून आपण एकत्र बसून निर्यातीचे धोरण निश्चित करण्याची गरज आहे. जेणेकरून ही निर्यात आपल्याला पुढच्या स्तरापर्यंत घेऊन जाईल. २०१८च्या आर्थिक वर्षात झालेल्या भारताच्या एकूण व्यापारी मालाच्या निर्यातीच्या तुलनेत प्लास्टिकची निर्यात तीन टक्क्यांहून कमी आहे; ती आता दुप्पट करण्याच्या दृष्टीने आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे. प्लास्टिक उत्पादनांच्या निर्यातीसाठी विलक्षण संधी असून, सध्या आपल्याकडे असलेल्या (फ्रान्स, जपान, जर्मनी आदी) बाजारपेठांमध्ये आपले अस्तित्त्व वाढविण्याची तसेच लॅटिन अमेरिका, आफ्रिका, सीआयएस आणि आशिया यांसारख्या नव्या बाजारपेठांचा शोध घेण्याची गरज आहे. आपल्या निर्यातीमध्ये कच्च्या मालाचे प्रमाण अजूनही जास्त असून, मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्यातीवर आपण लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे,’ असे मिश्रा यांनी नमूद केले.

‘इंजिनीअरिंग प्लास्टिक्स, बायो प्लास्टिक्स आणि बायो पॉलिमर्स यासारख्या मूल्यवर्धित उत्पादनांची निर्यात आपण वाढविली पाहिजे. नव्या उद्योगांना मार्गदर्शन करून त्यांना निपुण बनवावे, असे आवाहन आम्ही अनुभवी प्रमुख उद्योगांना करीत आहोत. भारताची पाच ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्यासाठी प्लास्टिक निर्यातदार सहाय्यभूत ठरतील, अशी आम्ही आशा करतो,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘प्लेक्सकॉन्सिल’चे अध्यक्ष बसाक म्हणाले, ‘प्लेक्सकॉन्सिल पुरस्कार म्हणजे प्लास्टिक निर्यातदारांनी केलेले प्रयत्न आणि पुढाकाराची आणि साक्ष आहे. क्षमता, पायाभूत सुविधा आणि कुशल कर्मचारी यांच्याबाबतीत भारताच्या प्लास्टिक उद्योगात अफाट संधी आहेत. जगभरातील पॉलिमर्स ग्राहकांमध्ये भारताचा सध्या पहिल्या पाच क्रमांकात समावेश आहे. देशभराता ३० हजारांहून अधिक प्लास्टिक प्रक्रिया युनिट्स असून, त्यात चार दशलक्षहून अधिक लोक काम करीत आहेत.’

बसाक पुढे म्हणाले, ‘लक्ष्य अवघड असले, तरी ते साध्य करण्यासारखे आहे. तंत्रज्ञान अद्ययावत करणे, आरएनडीच्या खर्चात वाढ करणे आणि भारतातून मूल्यवर्धित प्लास्टिक उत्पादनांच्या निर्यातीत वाढ करण्याच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण मार्केटिंग धोरण आखणे आदींद्वारे आपल्या सदस्यांच्या मदतीने कौन्सिलचे या दिशेने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय, निर्यातीबाबत जागरूकता निर्माण करून नव्या व्यावसायांचा निर्यातीमध्ये समावेश करण्याचाही कौन्सिलचा विचार आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search