Next
मिश्र डाळींचे वडे
BOI
Wednesday, January 03 | 12:04 PM
15 0 0
Share this story

मिश्र डाळींचे वडे

हिवाळ्याच्या दिवसांत वेगवेगळ्या डाळी आणि विशेषतः कडधान्ये खाण्यावर भर दिला पाहिजे, असं डॉक्टर सांगतात. याने शरीराचे उत्तम पोषण होते. मुलांना डब्यातही मग असेच काही चविष्ट आणि पौष्टिक देता आले तर..? यासाठीच ‘पौष्टिक डब्याची चविष्ट रेसिपी’ या सदरात या वेळी आपण पाहत आहोत मिश्र डाळींचे वडे...
................... 
मिश्र डाळीकडधान्ये, डाळी म्हटलं, की मुलं नाक मुरडतात. डाळींच्या भाज्या, वरण हे प्रकार त्यांना रोजचे असल्याने ते खात नाहीत. अशा वेळी याच वेगवेगळ्या डाळींचे एकत्रित असे मिश्रण करून बनवता येणारे हे वडे आहेत. हे वडे मुलांना आवडतीलही आणि त्यांना पोषणही देतील. 

साहित्य : 
तुरडाळ – एक वाटी, हरभरा डाळ – एक वाटी, उडीद डाळ – एक वाटी, मसूर डाळ – अर्धी वाटी, मीठ – चवीपुरते, कांदे – दोन बारीक चिरलेले, हळद, तळण्यासाठी तेल, हिंग


कृती : 
- सर्वप्रथम वरील सर्व डाळी एकत्र भिजत घालाव्यात. 
- तीन-चार तासांनंतर त्या मिक्सरमधून बारीक वाटून घ्याव्यात.
- त्यांत मीठ, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, हिंग, हळद घालावे. 
- हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.
- या मिश्रणात आता बारीक चिरलेला कांदा घालावा.
- एका कढईत तेल गरम करायला ठेवावे. 
- मिश्रणाचे लहान-लहान वडे करून, ते तळून घ्यावेत.
- कांदा न खाणार्यांहनी कांद्याऐवजी कोबी घालावा किंवा कडुलिंब बारीक चिरुन घालावा.
- पालक चिरून यात घातल्यासही ते छान लागतात. 
- गाजर किसून निम्म्या डाळीत घालावीत आणि निम्म्या डाळीत इतर काही भाज्या घालाव्यात.
- या वड्यांनी पोट तर भरतेच, पण सर्व जीवनसत्वेही मिळतात.

- आश्लेषा भागवत
मोबाइल : ९४२३० ०८८६८ 
ई-मेल : ashlesha0605@gmail.com

(लेखिका पुण्यातील आहारतज्ज्ञ आहेत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link