Next
‘पीएनजी’ १५ नवी स्टोअर सुरू करणार
प्रेस रिलीज
Tuesday, May 15, 2018 | 04:24 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : पी. एन. गाडगीळ अँड सन्स लिमिटेड (कंपनी) या स्टोअरच्या संख्येच्या बाबतीत महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या कंपनीने (स्रोत: क्रिसिल अहवाल) ५०० कोटी रुपयांच्या प्रारंभी समभाग विक्रीतील अंदाजे २५६ कोटी रुपयांची रक्कम महाराष्ट्र आणि लगतच्या राज्यांतील १५ ठिकाणी १५ नवी स्टोअर सुरू करण्यासाठी वापरायचे ठरवले आहे.

कंपनीच्या स्टोअरचे जाळे एक एप्रिल २०१२ रोजीच्या दोन स्टोअरवरून ३१ मार्च २०१८ रोजी २५ स्टोअरपर्यंत वाढले आहे. स्टोअरची संख्या आर्थिक वर्ष २०१९ मध्ये २९पर्यंत व आर्थिक वर्ष २०२०मध्ये ४०पर्यंत वाढवण्याचे नियोजन आहे. ही सर्व स्टोअर कंपनीच्या मालकीची आहेत व कंपनीद्वारे चालवली जातात.

कंपनीने दोन ठिकाणी लार्ज फॉरमॅट स्टोअर्स (सरासरी सहा हजार चौरस फूट बिल्ट अप क्षेत्र) सुरू करायचे ठरवले असून, त्यासाठी प्रत्येकी ५.३ कोटी रुपये भांडवली खर्च (कॅपेक्स) केला जाणार आहे; तसेच प्रत्येक १.१२ कोटी रुपये कॅपेक्सद्वारे नऊ स्मॉल फॉरमॅट स्टोअर (सरासरी एक हजार ६०० चौरस फूट बिल्ट अप क्षेत्र) सुरू करायचे ठरवले आहे. कंपनी प्रति स्टोअर १.८१ कोटी रुपये खर्च करून पुण्यातील उपनगरे व बदलापूर-डोंबिवली येथे मीडिअम फॉरमॅट स्टोअर (सरासरी २८५० चौरस फूट बिल्ट अप क्षेत्र) व प्रति स्टोअर १.१२ कोटी रुपये कॅपेक्सद्वारे शिर्डी व फलटण येथे स्मॉल फॉरमॅट स्टोअर सुरू करणार आहे. कंपनीने विशिष्ट कर्जांची परतफेड/प्रीपेमेंट करण्याच्या दृष्टीने ११२ कोटी रुपये व उर्वरित रक्कम अन्य कॉर्पोरेट उद्देशाने वापरण्याचे नियोजन केले आहे.

३१ मार्च २०१८ रोजी, कंपनीच्या सर्व २५ स्टोअरमध्ये असलेल्या एकूण इन्व्हेंटरीचे प्रमाण ३८१.९९९ कोटी रुपये असून ते प्रति स्टोअर सरासरी १५.२८कोटी रुपये आहे. कंपनीने नवी १५ स्टोअर सुरू करायचे ठरवले आहे आणि इतक्याच प्रमाणात सरासरी इन्व्हेंटरीची आवश्यकता व्यक्त केली आहे. प्रस्तावित नवी स्टोअर सुरू करण्यासाठी २२९.२ कोटी रुपयांची गरजेची आहेत, असा अंदाज कंपनीने व्यक्त केला आहे.

‘पी. एन. गाडगीळ’ ब्रँडची परंपरा सन १८३२पासून, प्रमोटर-अध्यक्ष गोविंद गाडगीळ यांच्या कुटुंबाच्या अंदाजे सहा पिढ्यांपासून चालत आली आहे. कंपनीच्या स्टोअरचे वर्गीकरण प्रामुख्याने स्टोअरच्या आकारानुसार तीन फॉरमॅटमध्ये केले आहे- ११ ‘लार्ज फॉरमॅट स्टोअर्स’, सहा  ‘मीडिअम फॉरमॅट स्टोअर्स’ व आठ ‘स्मॉल फॉरमॅट स्टोअर्स’. ३१ मार्च २०१८ रोजी, कंपनीची महाराष्ट्रात २३ स्टोअर्स आहेत व गुजरात व कर्नाटक येथे प्रत्येकी एक स्टोअर असून, एकूण बिल्ट अप क्षेत्र १००, २१३ चौरस फूट आहे. कार्यक्षम व्यवस्थापन व कार्यपद्धतीसाठी, कंपनीने स्टोअरची विभागणी झोनल मॉडेलनुसार तीन स्वतंत्र झोनमध्ये केली आहे – पुणे-झोन, नाशिक-झोन व सोलापूर-झोन.

आर्थिक वर्ष २०१४व आर्थिक वर्ष २०१८ या दरम्यान कंपनीच्या एकूण उत्पन्नामध्ये वार्षिक १२.२० टक्के वाढ झाली. कंपनीचे उत्पन्न आर्थिक वर्ष २०१४मध्ये ११५९.१९ कोटी रुपये होते व ते आर्थिक वर्ष २०१८मध्ये १,८३६.७५२ कोटी रुपये झाले. एबिटामध्ये वार्षिक १८.७६ टक्के म्हणजे, आर्थिक वर्ष २०१४मधील ५७.२३८ कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २०१८मध्ये ११३.८७ कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली व करोत्तर नफ्यामध्ये २४.८४ टक्के म्हणजे, आर्थिक वर्ष २०१४मधील २३.६९७ कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २०१८मध्ये ५७.५५८ कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली.

बीआयएसने नमूद केल्याप्रमाणे, कंपनीने गुणवत्ता व शुद्धता निकषांच्या अनुषंगाने २२ कॅरेटपर्यंतच्या व हॉलमार्क असलेल्या सुवर्ण दागिन्यांची विक्री करण्यासाठी संपूर्ण व्यवसायामध्ये गुणवत्ता नियंत्रणाच्या पद्धतींचा अवलंब केला आहे. कंपनीद्वारे विक्री केले जाणारे हिऱ्यांचे सर्व दागिने आयजीआय प्रमाणित आहेत व विकले जाणारे सर्व हिरे जीआयए प्रमाणित आहेत. तसेच, दागिन्यांचे डिझाइन व निर्मिती करत असताना विविध प्रकारच्या गुणवत्ता नियंत्रण पद्धती वापरल्या जातात. कंपनीने ग्राहकांच्या विशिष्ट पसंतीनुसार डिझाइन केलेली  निरनिराळी ज्वेलरी कलेक्शन सादर केली असून त्यामध्ये व्हॅल्यू मार्केट सेग्मेंटमधील लोकप्रिय ‘लाइट वेट ब्युटी’, ‘लव्ह अगेन अँड अगेन’ हिऱ्यांचे दागिने, ‘सप्तपदी ब्रायडल’ ज्वेलरी व टेम्पल ज्वेलरी कलेक्शन ‘लँटर्न कलेक्शन’ यांचा समावेश आहे.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search