Next
सिंगापूरमधील पर्यटनाची भारतीयांना भुरळ
प्रेस रिलीज
Thursday, March 14, 2019 | 11:49 AM
15 0 0
Share this article:नवी दिल्ली : सिंगापूरच्या सौंदर्याने भारतीयांना भुरळ घातली असून, २०१८मध्ये सलग चौथ्यांदा सिंगापूरने एक दशलक्षहून अधिक भारतीय प्रवाशांचे स्वागत केले. भारतातीत आउटबाउंड प्रवासासाठी सिंगापूर हे एक सर्वात पसंतीचे ठिकाण असल्याचेही यातून पुन्हा अधोरेखित झाले आहे. सिंगापूरसाठी व्हिजिटर सोर्स अरायव्हल (व्हीए) सोर्स मार्केट म्हणून भारताने चीन व इंडोनेशिया या देशांनंतर तिसरे स्थान स्थान कायम राखले असल्याचे सिंगापूर टुरिझम बोर्डने (एसटीबी) जाहीर केले आहे. भारताने पहिल्यांदा २०१७मध्ये हे स्थान साध्य केले होते. भारताने अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक वाढ नोंदवली.

बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली व मुंबई अशा महत्त्वाच्या महानगरांनी २०१८मध्ये सिंगापूरसाठी सर्वाधिक व्हिजिटरची नोंद केली. चार लाख ९८ हजार पर्यटक, त्यामध्ये वार्षिक वाढ आठ टक्के, अन्य महानगरे व दुसऱ्या क्रमांकाची शहरे यांना सहभागी करून घेण्याच्या ‘एसटीबी’च्या प्रयत्नांना यश आले व या शहरांतून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली. हैदराबाद, कोलकाता, पुणे, अमृतसर, कोइम्बतूर व विशाखापट्टणम यांचा समावेश असणाऱ्या या शहरांनी २०१८मध्ये दोन लाख ५३ हजार पर्यटकांचे योगदान दिले व वार्षिक १२ टक्के वाढ नोंदवली.२०१८मध्ये, क्रुझ हॉलिडेनिमित्त भारतातून एक लाख ६० हजार पर्यटक सिंगापूरमध्ये आले. त्यामध्ये २७ टक्के इतकी वार्षिक वाढ झाली आणि सिंगापूरसाठी आघाडीचे क्रुझ ट्रॅव्हल सोर्स मार्केट म्हणून भारताचे स्थान कायम राहिले. २०१८मधील तिसऱ्या तिमाहीपर्यंत, सिंगापूरमध्ये दोन दशलक्ष बीटीमाइस जागतिक व्हिजिटर आले, त्यामध्ये १४ टक्के वार्षिक वाढ झाली. २०१८मध्ये, मीटिंग्ज अँड इन्सेन्टिव्ह (एमअँडआय) यानिमित्त सिंगापूरमध्ये भारतातील सर्वाधिक ट्रॅव्हल ग्रुप आकृष्ट झाले. त्यामध्ये अॅम्वे इंडिया व व्होल्टास अशा प्रमुख कॉर्पोरेटचाही समावेश होता.

भारतीय बाजारपेठ विचारात घेता, ‘एसटीबी’साठी २०१८हे वर्ष अतिशय भरगच्च होते. ‘एसटीबी’ने ‘पॅशन मेड पॉसिबल’ हा डेस्टिनेशन ब्रँड आक्रमकपणे सादर केला आणि भारतातील वैविध्यपूर्ण ग्राहकांसमोर सिंगापूरचे वैविध्य मांडले. ‘एसटीबी’ने ग्राहकांना सहभागी करून घेण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले. यामध्ये व्हीएच वनसह भारतातील आंतरराष्ट्रीय पर्यटन संस्थेतर्फे पहिलावहिला इंग्रजी म्युझिक व्हीडिओ सहयोग, पेटीएम व ओला अशा ग्राहकांच्या नजिक असणाऱ्या ब्रँडबरोबर मार्केटिंगसाठी भागीदारी आणि दक्षिण भारताला लक्ष्य करण्यासाठी इलयराजा यांच्यासह म्युझिक प्रमोशनल सहयोग यांचा समावेश आहे. ‘एसटीबी’ने सिंगापूर हॉलिडेजचा प्रसार करणाऱ्या ट्रॅव्हलविषयक मध्यस्थांशी जोडले जाण्यासाठी २१ शहरांत ट्रॅव्हल ट्रेड उपक्रमही राबवले.  

जी. बी. श्रीथर२०१९मधील, दक्षिण भारतासाठी ‘एसटीबी’च्या पहिल्या ट्रेडविषयक कार्यक्रमाचा भाग म्हणून, चेन्नई व बेंगळुरू येथे बोलताना, ‘एसटीबी’चे एसएएमईएचे (दक्षिण आशिया, मध्य पूर्व व आफ्रिका) प्रादेशिक संचालक जी. बी. श्रीथर म्हणाले, ‘२०१८मध्ये सिंगापूरची लोकप्रियता वाढवल्याबद्दल आम्ही आमच्या सर्व सहयोगींचे अतिशय ऋणी आहोत. त्यांच्या सहकार्यामुळे आम्हाला भारतातून १.४४ दशलक्ष व्हिजिटर मिळाले. सिंगापूरमधील वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळे व साइटसीइंग, तसेच प्रवाशांच्या निरनिराळ्या आवडीनिवडींना वाव देणारे आकर्षक उपक्रम व वर्षभरातील महोत्सव व साजरीकरण विचारात घेता, २०१९मध्ये भारतातील अधिकाधिक व्हिजिटरचे सिंगापूरमध्ये स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’

२०१९मध्ये सिंगापूरमध्ये येण्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. १७ एप्रिलला ज्वेल चांगी विमानतळाचे भव्य उद्घाटन होणार आहे. यात १.७ अब्ज डॉलरची गुंतवणूक, १० मजली संकुल असणाऱ्या या प्रकल्पात २८० हून अधिक दुकाने व फूड अँड बेव्हरेज (एफअँडबी) आउटलेट असतील. अडीच झाडे व लाखभर झुडुपे असणारे, दोन वॉकिंग ट्रेल व ४० मीटर उंच रेन व्होर्टेक्स असणारा जगातील सर्वांत उंच इन्डोअर धबधबा, पाचमजली उद्यान पर्यटकांना निश्चितच भुरळ घालेल. सिंगापूर केबल कार हे सिंगापूरमधील एक लोकप्रिय आकर्षण सुंदर दृष्य दाखवण्याची ४५ वर्षे पूर्ण करत आहे आणि त्यानिमित्त फेबर पीक सिंगापूर येथील अरबोरा या टेकडीवरील रेस्तराँमध्ये अंदसना झाडावर ‘मिराक्युलस’ हा मल्टि-सेन्सरिअल व्हिडिओ-मॅपिंग शो पहिल्यांदाच दाखवला जाणार आहे. सिंगापूरच्या या एकमेव हिलटॉप ठिकाणी अनेक उपक्रम, कार्यक्रम नियोजित आहेत.

मादाम तुसाड्स संग्रहालयाच्या सहयोगाने टॉलिवूड सुपरस्टार महेश बाबू २५ मार्च २०१९ रोजी हैदराबाद येथे जगातील आपल्या पहिल्या व एकमेव वॅक्स पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. मादाम तुसाड्स संग्रहालयासाठी हा खास क्षण असणार आहे, कारण सिंगापूरमधील नसणाऱ्या एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या पुतळ्याचे अनावरण पहिल्यांदाच केले जाणार आहे. महेशचा वॅक्स पुतळा मादाम तुसाड्स सिंगापूरमध्ये आणला जाणार आहे. तेथे अगोदरच प्रतिष्ठित व्यक्तींचे पुतळे, आयफा पुरस्काराचा अनुभव मिळतो व आता चित्रपट कलाकारांचाही अनुभव मिळणार आहे. महेशच्या सर्व चाहत्यांना लवकरच सुपरस्टार महेशबरोबर सेल्फी काढण्याची संधी मिळणार आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search