Next
वैद्य खडीवाले यांच्या पुस्तकांचे शनिवारी प्रकाशन
प्रेस रिलीज
Thursday, September 07, 2017 | 04:57 PM
15 0 0
Share this article:

वैद्य प. य. खडीवालेपुणे : वैद्य प. य. वैद्य खडीवाले लिखित आणि डायमंड पब्लिकेशन प्रकाशित ‘आयुर्वेदीय वनौषधी’ (सचित्र वनस्पतींची उपयुक्तता), ‘सहजसोपे घरगुती आयुर्वेदीय उपचार’ आणि ‘एटूझेड आरोग्यवर्धिनी’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन व वैद्य खडीवाले यांचे सर्वांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

शनिवारी , ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत बालगंधर्व रंगमंदिरात हा प्रकाशन सोहळा होणार आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट व महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते या तीनही पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. प्रकाशनानंतर वैद्य प. य. वैद्य खडीवाले उपस्थितांच्या  शंकांचे निरसन करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.
 

कार्यक्रमाविषयी :

दिवस :  शनिवारी , ९ सप्टेंबर
वेळ :  सायंकाळी ५ ते ८
स्थळ :  बालगंधर्व रंगमंदिर
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search