Next
गँबियाच्या राजदूतांची आझम कॅम्पसला भेट
प्रेस रिलीज
Wednesday, January 17 | 01:27 PM
15 0 0
Share this story


पुणे : गँबियाच्या भारतातातील राजदूत जैनब जगने आणि कॉन्सुल जनरल एली बाह यांनी १६ जानेवारी रोजी ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ला (आझम कँपस) भेट देऊन, विविध महाविद्यालयांच्या शैक्षणिक प्रगतीची पाहणी केली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्ष आबेदा इनामदार, ‘अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस’चे संचालक आर. गणेसन यांनी स्वागत केले. आझम कॅम्पसच्या असेम्ब्ली हॉलमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. 

‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक प्रगतीने आम्ही प्रभावित झालो आहोत. गँबियाच्या शैक्षणिक व्यवस्थेत आणखी गुणवत्ता आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, संस्थेने गँबियाच्या शिक्षण व्यवस्थेत योगदान द्यावे,’ असे आवाहन गँबियाच्या भारतातील राजदूत जैनब जगने यांनी केले. 


‘आझम कॅम्पसमधील शैक्षणिक वातावरण प्रभावित करणारे आहे. येथील विद्यार्थी, प्राध्यापक, संस्थेचे नेतृत्व यांचा चांगला अनुभव आम्हाला आला.  गँबियातील आणि भारतातील सामाजिक वातावरण सारखे असल्याने, येथील शैक्षणिक प्रगतीचे मॉडेल गँबियातदेखील उभे राहावे आणि त्यासाठी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीची मदत व्हावी अशी आमची इच्छा आहे. गँबियातील कृषी आणि शिक्षण क्षेत्रात प्रगतीच्या अनेक संधी भारतीयांसाठी उपलब्ध असून व्हिसा प्रणाली देखील सुलभ आहे,’ असे उद्गार कॉन्सुल जनरल एली बाह यांनी काढले. 

डॉ. पी. ए. इनामदार म्हणाले, ‘गँबियाच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये योगदान देण्याच्या विनंतीला आम्ही सकारात्मक प्रतिसाद देऊ. तेथील प्राध्यापक, शिक्षकांना प्रशिक्षण, तंत्रज्ञानाची मदत आणि विद्यार्थी-प्राध्यापक आदान -प्रदान उपक्रम आखता येण्यासारखे आहेत. त्यासाठी लवकरच एकत्रित चर्चा केली जाईल.’
या वेळी तन्वीर इनामदार, एस. ए. इनामदार, गँबियाचे प्रोटोकॉल ऑफिसर रहमान, श्री. पंजाबी आदी मान्यवर उपस्थित होते.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link