Next
पं. कोपरकर यांना ‘पं. संगमेश्वर गुरव स्मृती पुरस्कार’ प्रदान
प्रेस रिलीज
Monday, May 07, 2018 | 03:59 PM
15 0 0
Share this article:

पं. विजय कोपरकर यांना प्रा. डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते ‘पं. संगमेश्वर गुरव स्मृती पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी (डावीकडून) कलानुभव चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त पं. कैवल्यकुमार गुरव,पं. विजय कोपरकर, प्रा. डॉ. रामचंद्र देखणे आणि भार

पुणे  : किराणा घराण्याचे सुप्रसिध्द गायक पं. संगमेश्वर गुरव यांच्या पुण्यतिथीनिमित्त कलानुभव चॅरिटेबल ट्रस्ट’तर्फे दोन दिवसीय कलानुभव संगीत महोत्सव नुकताच पुण्यात आयोजित करण्यात आला होता. 

या वेळी अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतासाठी दिलेल्या योगदानाबद्दल प्रसिध्द शास्त्रीय गायक पं. विजय कोपरकर यांना संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते ‘पं. संगमेश्वर गुरव स्मृती पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. महोत्सवाच्या शुभारंभदिनी ज्येष्ठ बासरीवादक पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरासिया यांचे शिष्य विवेक सोनार यांना नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते ‘पं. संगमेश्वर गुरव युवा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. कलानुभव चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त पं. कैवल्यकुमार गुरव आणि भारती बऱ्हाटे या वेळी उपस्थित होत्या. महोत्सवाचे हे चौथे वर्ष होते.
विवेक सोनार
पुरस्काराला उत्तर देताना पं. विजय कोपरकर म्हणाले, ‘संगीत हे खरेतर सर्व विसरून देण्यासाठी आहे. मात्र, आज अनेक कलाकार प्रसिद्ध, पैसे यांच्या मागे लागतात हे पाहून वाईट वाटते. कलाकार हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो हेच मी संगीत शिकवताना अनुभवतो कारण याच शिकवण्यामुळे मीही समृद्ध झालोय. याबरोबरच आपली कला, गुरु आणि आई वडील यांपेक्षा आपण मोठे होत नाही हे कलाकाराने लक्षात ठेवायला हवं.’  

डॉ. जयंती कुमरेश
या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी विवेक सोनार यांचे बासरीवादन आणि तमिळनाडू येथील ख्यातनाम वीणावादक डॉ. जयंती कुमरेश यांचे वीणावादन झाले. 

पं. विजय कोपरकर आणि पं. कैवल्यकुमार गुरव यांच्या गायनाने महोत्सवाचा समारोप झाला. प्रशांत पांडव यांनी तबला, सुयोग कुंडलकर यांनी संवादिनी तर आदित्य जोशी, चारुहास दामले यांनी तानपुऱ्यावर त्यांना साथसंगत केली. आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

पं. कैवल्यकुमार गुरव
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search