पुणे : विवेकानंद केंद्र या संस्थेतर्फे युवा नेतृत्व विकासासाठी भारतीय संस्कृती परीक्षा २०१८चे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा फुले, स्वामी विवेकानंद, गाडगेमहाराज, भगिनी निवेदिता, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘प्रेरणादीप’ पुस्तकावर ही परीक्षा होणार आहे.
ही परीक्षा सदाशिव पेठेतील पेरूगेट भावे स्कूल येथे रविवार, दि. १९ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे. या परीक्षेसाठी पदवी-पदव्युत्तर व खुला गट करण्यात आले आहेत. उत्तीर्ण झालेल्यांना पुरस्कार दिले जाणार आहे; तसेच कन्याकुमारी युवा नेतृत्व विकसन शिबिरात सहभागाची संधी दिली जाणार आहे.
परीक्षेविषयी :
दिवस : रविवार, १९ ऑगस्ट २०१८
वेळ : सकाळी ९.३० वाजता
स्थळ : पेरूगेट भावे स्कूल, सदाशिव पेठ, पुणे.
अधिक माहिती व नोंदणीसाठी संपर्क : २०२- २४३२ ५५५३