Next
निरंजन घाटे, नरहर गाडगीळ, अशोक कामत
BOI
Wednesday, January 10 | 03:45 AM
15 0 0
Share this story

१८०हूनही जास्त पुस्तकं लिहिताना प्रामुख्याने विज्ञान हा विषय हाताळणारे निरंजन घाटे, राजकारणात असूनही आपल्यातला लेखक जपणारे नरहर विष्णू ऊर्फ काकासाहेब गाडगीळ आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक अशोक कामत आणि  यांचा दहा जानेवारी हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय....
......

निरंजन सिंहेंद्र घाटे 

दहा जानेवारी १९४८रोजी मुंबईत जन्मलेले निरंजन घाटे हे बहुप्रसवा लेखक आणि वेगवान वाचक! १८०च्या वर पुस्तकं आपल्या नावावर असलेले घाटे प्रचंड वेगाने अखंड वाचनही करत असतात.

प्रामुख्याने विज्ञान विषयावर लिहिणाऱ्या घाटे यांनी एकीकडे स्त्री-पुरुष आकर्षणाचा शास्त्रोक्त वेध घेणाऱ्या ‘प्रेम, स्पर्श आणि आकर्षण’ किंवा सेक्सबद्दल गैरसमज दूर करणाऱ्या ‘सेक्सायन’सारख्या पुस्तकांबरोबरच, दुसरीकडे युद्धकथा सांगणाऱ्या ‘रणझुंजार’ आणि लोकप्रिय लेखकांच्या आत दडलेल्या काही विक्षिप्त आणि विचित्र स्वभावाच्या माणसांवर प्रकाश टाकणारं ‘लोकप्रिय साहित्यिक’सारखी पुस्तकंही लिहिली आहेत. 

त्यांनी आजपावेतो जे स्तिमित आणि अचंबित करणारं जबरदस्त वाचन केलंय, त्यावर प्रकाश टाकणारं ‘वाचत सुटलो त्याची गोष्ट’ हे रंजक पुस्तक लिहिलं आणि तेही प्रचंड लोकप्रिय झालं.  

आदिवासींचे अनोखे विश्व, अग्निबाणांचा इतिहास, अमेरिकन चित्रपटसृष्टी, आपल्या पूर्वजांचे तंत्रज्ञान, आरोग्य गाथा, असे घडले सहस्रक, असे शास्त्रज्ञ अशा गमती, आश्चर्यकारक प्राणिसृष्टी, भविष्यवेध, ज्ञानदीप, ज्ञानतपस्वी, गमतीदार विज्ञान, घर हीच प्रयोगशाळा, गुन्हेगारीच्या जगात, जगप्रसिद्ध विज्ञानकथा, जल झुंजार, कळसूत्री, खगोलीय गमती जमती, खाणं पिणं, मृत्यूदूत, मुलांचे विश्व, ऑपरेशन सद्दाम, प्रदूषण, रहस्यरंजन, रोबॉट फिक्सिंग, संभव असंभव, स्वप्नचौर्य, स्वप्नरंजन, स्वयंवेध, तरुणांनो होशियार!, दॅट क्रेझी इंडियन, उल्का आणि धूमकेतू, वसुंधरा, विज्ञान संदर्भ, विज्ञानाने जग बदलले, विसाव्या शतकातील विज्ञानमहर्षी, यंत्रमानवाची साक्ष, ११ सप्टेंबर, आई असंच का? बाबा तसंच का?, अदभुत किमया, आधुनिक युद्ध कौशल्य, आधुनिक युद्धसाधने – अशी त्यांची अनेक पुस्तकं वाचकप्रिय आहेत. 

त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार, मो. वा. चिपळोणकर पुरस्कारासह आठ वेळा राज्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.
 
(निरंजन घाटे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून मागविण्यासाठी येथे क्लिक करा. पुण्यात झालेल्या वाचन जागर महोत्सवात घाटे यांच्याशी झालेल्या गप्पागोष्टींबद्दलचे वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा. त्यांच्या वाचनाबद्दलच्या या गप्पांचा व्हिडिओ शेवटी देत आहोत.)
.....................

नरहर विष्णू गाडगीळ 

दहा जानेवारी १८९६ रोजी जन्मलेले नरहर विष्णू उपाख्य काकासाहेब गाडगीळ हे राजकीय नेते म्हणून ओळख असणारे वैचारिक लेखक होते. 

ग्यानबाचे अर्थशास्त्र, राज्यशास्त्रविचार अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

१९६२ साली साताऱ्याला झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 

१२ जानेवारी १९६६ रोजी त्यांचं निधन झालं. 
..............

अशोक प्रभाकर कामत 

दहा जानेवारी १९४२ रोजी जन्मलेले अशोक प्रभाकर कामत हे संतसाहित्याचे गाढे अभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांनी पुणे विद्यापीठामध्ये संत नामदेव अध्यासनाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला होता.
 
त्यांनी १९७४ साली ‘महाराष्ट्र के नाथपंथीय कवियों का हिंदी काव्य’ हा प्रबंध लिहून हिंदी विषयात आणि नंतर १९८४ साली ‘संत नामदेवांचे जीवन आणि हिंदी-मराठी काव्य यांचा पुनर्विचार’ हा प्रबंध लिहून मराठीत अशा दोन डॉक्टरेट मिळवल्या आहेत. 

संत नामदेव आणि गुरू नानकदेव, महात्मा बसवेश्वर, महाराष्ट्र और राष्ट्रभाषा, श्रीनामदेव-एक विजयमात्रा, सुभाषमय दिवस, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

त्यांना आळंदीच्या ज्ञानेश्वर संस्थानाकडून, तसंच कर्नाटकातल्या वीरशैव संस्थानाकडून पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसंच राष्ट्रमित्र पुरस्कारही मिळाला आहे.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link