Next
जेट एअरवेजतर्फे प्रवाशांसाठी विशेष मेजवानी
प्रेस रिलीज
Friday, December 15, 2017 | 05:25 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : यंदाच्या सणासुदीच्या कालावधीत जेट एअरवेजच्या विमानाने लंडनला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोस्ट चिकन व युल लॉग अशी विशेष मेजवानी मिळणार आहे. भारतातील प्रीमिअर, परिपूर्ण सेवा देणाऱ्या या आंतरराष्ट्रीय विमान कंपनीतर्फे मुंबई व दिल्ली ते लंडन हिथ्रो यादरम्यानच्या निवडक विमानांत ख्रिसमस साजरा केला जाणार आहे.

जेट एअरवेजच्या शेफनी विविध पर्यायांतून ख्रिसमसविषयक खास पदार्थांची निवड केली आहे. १५ डिसेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत फर्स्ट क्लास व प्रीमिअर श्रेणीतील पाहुण्यांना विविध प्रकारचे पदार्थ चाखण्याची संधी मिळणार असून, त्यामध्ये रोस्ट चिकन, रोस्ट पोटॅटो बॅरल, स्पिनच टार्ट व युल लॉग यांचा समावेश असेल. इकॉनॉमी श्रेणीतून जाणाऱ्या प्रवाशांना ख्रिसमसच्या पूर्वसंध्येपासून (२४ डिसेंबर) वर्षाअखेरीपर्यंत या मार्गांवर रोस्ट चिकन दिले जाणार आहे.

पृथ्वीवर सर्वत्र हिवाळ्याचा रंग चढत असल्याने प्रवासासाठी हा उत्तम हंगाम आहे. ख्रिसमसचा अपवाद वगळता, हिवाळ्याच्या महिन्यांत गर्दी कमी असल्याने संबंधित ठिकाणांचे विविध पैलू उलगडता येतात.

लंडन हे जगातील सर्वात लोकप्रिय पर्यटन ठिकाणांपैकी एक असून, मित्रमंडळी व कुटुंबीयांबरोबर घालवलेला वेळ, विविध संस्कृती व लँडस्केपचा घेतलेला वेध अशा अविस्मरणीय स्मृती तिथे निर्माण केल्या जातात. पाहुण्यांना पूर्णतः युरोपीय थाट असलेली, परंपरा व आधुनिकता यांची सांगड अनुभवता येते. वर्षभर धमाल व उपक्रम सुरू असलेल्या लंडनमध्ये उत्तम नाइटलाइफ, वैविध्यपूर्ण पदार्थ, भरपूर खरेदी व साइटसीइंग यांचे असंख्य पर्याय आहेत.

जेट एअरवेजचे उत्पादन व सेवांचे कार्यकारी उपाध्यक्ष जयराज शण्मुगम यांनी सांगितले, ‘भारतातली पसंतीची विमानकंपनी म्हणून प्रवाशांसाठी विमानात अप्रतिम सेवा देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहोत व आमच्या सर्व प्रवाशांना सुखद अनुभव मिळण्यासाठी खाद्यपदार्थ हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आम्ही ख्रिसमसनिमित्त केलेली शिफारस आमच्या प्रवाशांना आवडेल आणि त्यांचा आमच्यासोबतचा प्रवास विशेष व अविस्मरणीय होईल, असा विश्वास वाटतो.’

जेट एअरवेजने विमानातील उत्तम सेवा, लवचिक व सोयीचे वेळापत्रक व चांगली कनेक्टिविटी यामार्फत भारत व जग यांदरम्यान पसंतीची विमानकंपनी म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. विमानकंपनीने २०१७ साठीचा ट्रिपअॅडव्हॉयजर ट्रॅव्हलर्स चॉइस अॅवॉर्ड जिंकला आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search