Next
‘पालघर पोटनिवडणुकीत ‘कर्नाटक’चे प्रतिबिंब दिसेल’
प्रेस रिलीज
Wednesday, May 16 | 05:24 PM
15 0 0
Share this story

पालघर : ‘कर्नाटकच्या विजयाचे प्रतिबिंब पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालातही दिसेल,’ असा विश्वास भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी व्यक्‍त केला.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार ऐन भरात असताना कर्नाटकमध्ये भाजपने जबरदस्त कामगिरी करत एकहाती विजय खेचून आणला आहे. या निकालाबद्दल मत व्यक्त करताना ते बोलत होते. ते म्हणाले, ‘फक्त कर्नाटकच नव्हे, तर गेल्या साडेतीन ते चार वर्षांत देशभरातील विविध राज्यांत भाजपने एकहाती विजय मिळवला आहे. त्याच कामगिरीची पुनरावृत्ती कर्नाटकमध्ये झाली असून, या विजयाचे प्रतिबिंब पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत नक्कीच उमटेल.’

याच मुद्यावर बोलताना राज्यमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, ‘काँग्रेसच्या जातीय राजकारणाला कर्नाटकमधील मतदारांनी संपूर्णतः नाकारले आणि भाजपच्या विकासाधारित राजकारणाला पसंती दिली, तसाच ट्रेंड पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतही दिसेल. कर्नाटकच्या विजयाबद्दल तेथील मतदारांचे आभार मानत हा विजय म्हणजे भाजपच्या दक्षिण दिग्विजयाची सुरुवात आहे.’

‘खरेतर कर्नाटकमध्ये काँग्रेसने जातीय राजकारण करून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला; मात्र कर्नाटकातील मतदारांनी जातीयतेला थारा न देता भाजपने सुरू केलेल्या विकास केंद्रीत राजकारणालाच पसंती दिली. या विजयामुळे भाजपच्या दक्षिण दिग्विजयाला सुरुवात झाली असून, भविष्यात यापेक्षा मोठा विजय भाजपला मिळेल,’ असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link