Next
‘मोबिक्विक’ ग्राहकांसाठी दिवाळीनिमित्त नवी योजना
प्रेस रिलीज
Tuesday, November 06, 2018 | 04:27 PM
15 0 0
Share this story

नवी दिल्ली : ‘मोबिक्विक’चे ग्राहक आता आपल्या डिजिटल सोन्याला कॅरेटलेनमधून ऑनलाइन पद्धतीने भारतातील त्यांच्या कोणत्याही स्टोअरमधून दागिन्यांमध्ये बदलू शकत असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. या नवीन योजनेमध्ये ग्राहक त्यांच्या सोने शिलकीच्या बदल्यात आपल्या आवडीचे दागिने खरेदी करू शकतात. ही सुविधा सर्व अँड्रॉईड आणि आयओएस युजरसाठी उपलब्ध आहे. दिवाळीच्या विशेष ऑफरचा भाग म्हणून ‘मोबिक्विक’च्या ग्राहकांना त्यांच्या सोने शिलकीद्वारे दागिन्यांच्या खरेदीवर थेट एक हजार रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळवता येणार आहे.

‘मोबिक्विक’ अॅपद्वारे डिजिटल स्वरूपातून भौतिक स्वरूपात सोन्याचे रूपांतरण तीन सोप्या टप्प्यांच्या प्रक्रियेद्वारे फक्त काही सेकंदात करता येईल. ‘मोबिक्विक’चे ग्राहक कॅरेटलेन स्टोअरला किंवा कॅरेटलेन वेबसाइटला भेट देऊन आपल्या डिजिटल सोने शिलकीच्या बदल्यात दागिने खरेदी करण्याची विनंती करू शकतात. ग्राहकांना त्यांचा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि किती सोने रिडीम करायचे आहे त्याचे प्रमाण (ग्रॅममध्ये) द्यावे लागेल. कॅरेटलेनने व्यवहाराची प्रक्रिया सुरू केल्यावर ‘मोबिक्विक’च्या ग्राहकाला ओटीपी व व्यवहाराच्या रकमेचा एक एसएमएस मिळेल. कॅरेटलेनच्या कॅशियरला व्हेरिफिकेशनसाठी ओटीपी दिल्यावर ग्राहकाच्या डिजिटल सोने शिलकीमधून तेवढ्या प्रमाणात सोन्याची कपात केली जाईल आणि कॅरेटलेनला हस्तांतरण केले जाईल. ऑनलाइन खरेदीसाठी ग्राहकाला वेबसाइटवर लॉगइन करून कॉल बॅकची विनंती करणे आवश्यक आहे.

‘मोबिक्विक’ने मागच्या महिन्यात ‘सेफगोल्ड’च्या भागीदारीने आपल्या अॅपमध्ये डिजिटल सोने श्रेणीचा शुभारंभ केला होता. ‘सेफगोल्ड’ या डिजिटल मंचाद्वारे ग्राहकांना व्हॉल्टेड सोने खरेदी, विक्री आणि प्राप्त करण्याची सुविधा दिली जाते. ‘मोबिक्विक अॅप’च्या युजरना किमान एक रुपयांपासून ९९.५ टक्क्यांपर्यंत शुद्ध, २४ कॅरेट सोने व विक्रीचा पर्याय मिळतो.

या विषयी बोलताना ‘मोबिक्विक’च्या सह-संस्थापक आणि संचालक उपासना टाकू म्हणाल्या, ‘या उत्सवाच्या सुरुवातीला सुरू केलेल्या आमच्या डिजिटल सोने श्रेणीमध्ये आम्हाला विलक्षण प्रतिसाद मिळाला आहे. सोने खरेदीसाठी दिवाळी हा सर्वात शुभ कालावधींपैकी एक समजला जातो. या भागीदारीद्वारे आम्ही ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही स्वरूपांचे परिपूर्ण एकत्रीकरण सादर करीत आहोत, ज्यामध्ये ‘मोबिक्विक’चे ग्राहक त्यांच्या ‘मोबिक्विक अॅप’मधील डिजिटल सोने शिलकीच्या बदल्यात कॅरेटलेन स्टोअरमध्ये सोन्याचे दागिने खरेदी करू शकतात. आम्ही ‘सोने’ श्रेणीवर फार मोठी भिस्त ठेवली आहे आणि या नवीन सुविधेला देखील ग्राहकांकडून विलक्षण प्रतिसाद मिळेल अशी आशा करतो.’

‘सेफगोल्ड’चे गौरव माथूर म्हणाले, ‘आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांची ‘सेफगोल्ड’ शिल्लक रिडीम करण्याचा पर्याय प्रदान करून आनंदित आहोत, जी त्यांनी कॅरेटलेन वेबसाइट आणि स्टोअर्समध्ये ‘मोबिक्विक अॅप’द्वारे खरेदी करून जमा केली आहे. या प्रदात्यामुळे आमच्या ग्राहकांच्या सेफगोल्ड होल्डिंग्जला अधिक कार्यक्षमता लाभली आहे आणि यामुळे ‘सेफगोल्ड’ हे भारतातील एकमेव डिजिटल गोल्ड मंच व ‘मोबिक्विक’ एकमेव फिन्टेक मंच बनले आहे जे दागिन्यांच्या स्वरूपात सतत विनिमय प्रदान करतात.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link