Next
‘सीएम चषका’मध्ये १४ लाख लोकांचा सहभाग
प्रेस रिलीज
Friday, November 23, 2018 | 04:55 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : महाराष्ट्रातील सर्वांत मोठी क्रीडा-सांस्कृतिक स्पर्धा असलेल्या ‘सीएम चषका’ला युवकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, यामध्ये सहभागी होण्यासाठी आतापर्यंत १४ लाख लोकांनी नोंदणी केली आहे. भारतीय जनता युवा मोर्चातर्फे (भाजयुमो) आयोजित ‘सीएम चषका’ला प्रदेशस्तरावर उत्तम  प्रतिसाद मिळत असून, मुंबई शहरातून अडीच लाखांहून जास्त युवकांनी यात नोंदणी केली आहे.

‘सीएम चषका’साठी २१ नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण १३ लाख ९२ हजार १०२ लोकांनी नोंदणी केली आहे. यात पाच लाख ४० हजार ८१६ लोकांनी ऑनलाइन आणि आठ लाख ५१ हजार २८६ लोकांनी थेट अर्ज भरून आपली नोंदणी केली आहे. मुंबईच्या एकूण सहभागी असलेल्यांची संख्या दोन लाख ६७ हजार ८०५ एवढी आहे. यामध्ये मुख्यत्वे युवक आणि विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी आहेत.

‘सीएम चषका’शी खूप कमी वेळात मोठ्या संख्येने लोक जोडले गेल्याचे सांगून महाराष्ट्र प्रदेश ‘भाजयुमो’चे अध्यक्ष योगेश टिळेकर म्हणाले, ‘प्रदेशस्तरावरील प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबाशी जोडले जाण्याच्या या प्रयत्नाच्या यशस्वीतेमागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विकासपुरुष असलेली प्रतिमा एकमेव कारण आहे.’

युवा मोर्चार्चे मुंबई अध्यक्ष मोहित कंबोज म्हणाले, ‘मुंबईसारख्या व्यस्त शहरातही ‘सीएम चषका’शी अडीच लाखांहून जास्त लोक जोडले जातात ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लोकप्रियतेची एकप्रकारे पोचपावतीच आहे.’

प्रदेशस्तरावरील प्रत्येक गाव आणि शहरात ‘सीएम चषका’अंतर्गत होणाऱ्या क्रिकेट, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, कॅरम, कुस्ती, पेंटिंग, रांगोळी, कविता, नृत्य आदी स्पर्धांमध्ये लोक खूप उत्साहाने भाग घेत आहेत. विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुण विशेषतः महिलांमध्ये मोठा उत्साह आहे. महाराष्ट्रात भाजप सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक नोव्हेंबरला पुण्यातून सुरू झालेल्या ‘सीएम चषका’ची समाप्ती स्वामी विवेकानंद जयंतीच्या दिवशी म्हणजेच १२ जानेवारी २०१९ रोजी भव्य सोहळ्याने मुंबईत होईल.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search