Next
ससून लिव्हर ट्रान्सप्लांट सेंटरचा लोकार्पण सोहळा
प्रेस रिलीज
Tuesday, March 27, 2018 | 11:51 AM
15 0 0
Share this article:


पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयातील ‘लिव्हर ट्रान्सप्लांट सेंटर’चा लोकार्पण सोहळा, २४ मार्च २०१८ रोजी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या हस्ते संपन्न  झाला. ‘अग्रवाल क्लब, पुणे चॅरिटेबल ट्रस्ट’ने यासाठी देणगी दिली. या वेळी विजय मित्तल, सुभाष गोयल, राजेश टेकरीवाल, राजीव अगरवाल आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 

अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले म्हणाले, ‘ससून फॉर कॉमन मॅन अशी जनमानसांत ओळख निर्माण करताना, ससून सुसज्ज केले आहे. लिव्हर ट्रान्सप्लांट सेंटरच्या देणगीसाठी अगरवाल क्लब चॅरिटेबल ट्रस्टचे आभार. गरजू रुग्णांसाठी हे लिव्हर ट्रान्सप्लांट सेंटर आशास्थान आहे.’ 

राजेश टेकरीवाल यांनी अग्रवाल क्लब पुणे चॅरिटेबल ट्रस्ट करीत असलेल्या सेवाकार्याचा आढावा घेतला. राजकुमार अगरवाल, देवकीनंदन  अगरवाल, जयकिशन अगरवाल, के. लालजी यांनी या सेवाप्रकल्पासाठी योगदान दिले. 

कार्यक्रमाला डॉ. वंदना दुबे, डॉ. कमलेश बोकील, डॉ. हरीश टाटिया, डॉ. किरण जाधव, डॉ. संतोष थोरात आणि डॉ. सोमनाथ सलगर उपस्थित होते.
हिरा अगरवाल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search