Next
ठाणे पालिकेतर्फे दोन जुलैला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम
प्रेस रिलीज
Saturday, July 01, 2017 | 06:04 PM
15 0 0
Share this article:

ठाणे : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत ठाणे महानगरपालिकेतर्फे उद्या, रविवारी, दोन जुलै रोजी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत नागरिकांनी आपल्या बालकांना पल्स पोलिओचा डोस द्यावा असे आवाहन महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे व महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे.  

जागतिक आरोग्य संघटनेने पोलिओचे समूळ उच्चाटन करण्याचे ध्येय निर्धारित केले असून, त्या पार्श्वभूमीवर भारतात सातत्याने पल्स पोलिओ विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येते. गेल्या १५ वर्षांपासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम ठाणे महापालिकेने उत्कृष्टपणे राबविली आहे. या मोहिमेला सर्व स्तरांतील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.  

दोन जुलै रोजीही ठाणे महापालिकेच्या वतीने विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून, या मोहिमेंतर्गत एकही बालक पोलिओ डोस घेण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे. या दिवशी महापालिकेतर्फे शहरात विविध ठिकाणी बूथवर व त्यानंतर पुढील पाच दिवस प्रत्येक घरोघरी जाऊन लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना पोलिओचे डोस देण्यात येणार आहेत. नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search