Next
पारंपरिक हस्तकलेच्या वस्तूंचे प्रदर्शन ‘कारीगर हाट’
BOI
Thursday, August 01, 2019 | 05:04 PM
15 0 0
Share this article:


पुणे : वैविध्यपूर्ण पारंपरिक हस्तकलांचे अप्रतिम नमुने बघण्याची आणि खरेदी करण्याची संधी पुणेकरांसाठी उपलब्ध झाली आहे. हस्त कारीगर या दिल्लीतील संस्थेतर्फे ‘कारीगर हाट’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

शुक्रवार, दोन ऑगस्ट ते पाच ऑगस्ट दरम्यान, हर्षल हॉल येथे हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. या प्रदर्शनात परंपरागत हस्तकलेने तयार केलेल्या वस्तू, तसेच हातमागावरील उत्पादने उपलब्ध होणार आहेत.  

पुण्यातील हस्तकलेच्या चाहत्यांसाठी हे प्रदर्शन म्हणजे एक पर्वणी असून, या माध्यमातून त्यांना कलाकारांना प्रोत्साहन देण्याचीही संधी मिळणार आहे. रसिकांच्या प्रोत्साहनामुळे या कलाकारांनाही आपली कला पुढे सुरू ठेवण्याचा आत्मविश्वास मिळणार आहे. 

कार्यक्रमाविषयी :

‘कारीगर हाट’ प्रदर्शन 
स्थळ : हर्षल हॉल, कर्वे रस्ता, कोथरूड.
दिवस : दोन ते पाच ऑगस्ट २०१९
वेळ : सकाळी १०.३० ते रात्री ८.३०
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 15 Days ago
Good idea . Hope , it enjoyes good sale . Best wishes .
0
0

Select Language
Share Link
 
Search