Next
‘पुणे येथे आधार नोंदणी, दुरुस्ती केंद्र प्रस्तावित’
प्रेस रिलीज
Tuesday, January 02 | 04:54 PM
15 0 0
Share this story

अनिल शिरोळेपुणे : ‘पुणे शहरातील ४१ पोस्ट ऑफिसमध्ये आधार नोंदणी, दुरुस्ती केंद्र प्रस्तावित असल्याची माहिती केंद्रीय संचार मंत्री मनोज सिन्हा यांनी दिली आहे,’ असे खासदार अनिल शिरोळे यांनी सांगितले.

शहरातील नागरिकांसाठी आधार नोंदणी, दुरुस्तीची होणारी अडचण लक्षात घेता खासदार शिरोळे यांनी दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांच्याशी पत्रव्यवहार करून पोस्ट ऑफिसमध्ये आधार नोंदणी, दुरुस्ती केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. त्या पत्राला उत्तर देताना सिन्हा यांनी पुणे शहरात ४१ पोस्ट ऑफिसमध्ये आधार नोंदणी, दुरुस्ती केंद्र प्रस्तावित असल्याचे खासदार शिरोळे यांना कळवले. त्यामुळे प्रस्तावित केंद्र तातडीने सुरू होतील, अशी अपेक्षा शिरोळे यांनी व्यक्त केली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link