Next
सिनेमाचे दिवस
BOI
Tuesday, August 07, 2018 | 11:03 AM
15 0 0
Share this article:

स्वातंत्र्यचळवळीत सहभागी झालेल्या आणि सिनेमा, नाटक वर्ज्य असलेल्या घरात जन्मलेला, वाढलेला मुलगा मोठा झाल्यावर चित्रपट निर्माता म्हणून लौकिक प्राप्त करतो, तेही वयाच्या चाळीशीनंतर. या चित्रपट निर्मात्याच्या, अरुण गोडबोले यांच्या धाडसाची ही कहाणी आहे. कशासाठी, प्रेमासाठी, नशीबवान, बंडलबाज यांसारख्या गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली आहे.

चित्रपट दिग्दर्शन, लघुपट निर्मितीही केली आहे. त्यामुळे मराठी सिनेमाची दुनिया कशी चालते, सिनेमा कसा त्यात होतो याची उत्तरे या पुस्तकातून मिळतात. अर्थात बारकाईने अभ्यास केला होता. घरातून होणाऱ्या विरोधालाही ते सामोरे गेले होते. प्रत्यक्ष काम करताना आलेल्या अडचणी, आर्थिक अपयश आणि पुरस्कार, आत्मसन्मान याची माहितीही  पुस्तकातून मिळते. विशेष म्हणजे त्यांच्या प्रत्येक चित्रपटाच्या निर्मितीसंबंधी तपशीलवार माहिती रंजकपणे मांडण्यात आली आहे.

प्रकाशक : कौशिक प्रकाशन
पाने : २९३
किंमत : ३६० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search