Next
सावंदे जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले जयंती
मिलिंद जाधव
Saturday, January 05, 2019 | 11:59 AM
15 0 0
Share this article:भिवंडी : स्त्री शिक्षणाचे बीज रोवणाऱ्या समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची जयंती तालुक्यातील सावंदे जिल्हा परिषद शाळेत साजरी करण्यात आली.

या वेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या जीवन प्रवासाची माहिती देऊन मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंवर भाषणे सादर केली. स्वराज्याची निर्मिती करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास आजच्या पिढीपर्यंत पोहचावा यासाठी अक्षय भोईर, स्वप्नील भोईर, रोहित जाधव या तरुणांनी एकत्र येऊन सावंदे जिल्हा परिषद शाळेत शिवाजी महाराज यांच्या विचारांबद्दल मार्गदर्शन केले आणि ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे वाटप केले.अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हा प्रधान सचिव गणेश शेलार यांनी या अंधश्रद्धेबाबत चमत्कारचे प्रयोग दाखवून त्यामागचे विज्ञान स्पष्ट केले. या कार्यक्रमातून सावित्रीबाई फुले यांचे कार्य आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांचे विचार एकत्रपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यात आले.

या वेळी शाळा कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे मुख्याध्यापक खंडू भोईर, मनोज गोंधळी, संतोष गाढे, हेमंत गिरी आदी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Balkrishna gramopadhye About 199 Days ago
Hope , more schools take up the idea. Best wishes. Follow
0
0

Select Language
Share Link
 
Search