Next
७० टक्के रुग्णांना वेनस थ्रॉम्बोएम्बॉलिझमचा धोका
‘रुबी हॉल क्लिनिक’ने केलेल्या अभ्यासाचा निष्कर्ष
प्रेस रिलीज
Monday, July 22, 2019 | 12:37 PM
15 0 0
Share this article:


पुणे : रुग्णालयातील वास्तव्यादरम्यान ७० टक्के रुग्णांना वेनस थ्रॉम्बोएम्बॉलिझम (व्हीटीई) होण्याचा धोका संभवतो, असा निष्कर्ष रुबी हॉल क्लिनिकतर्फे सनोफीच्या सहकार्यातून नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे. 

मेंदू आणि हृदयाकडे रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या निर्माण होतात तेव्हा त्याचा परिणाम हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक यामध्ये होतो. बर्‍याच भारतीयांना या दोन गंभीर आरोग्य धोक्यांबद्दल माहिती आहे; मात्र त्यांना ‘व्हीटीई’ म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या निर्माण होऊ शकतात याविषयी माहिती नसते. हाताच्या किंवा पायाच्या रक्तवाहिन्यांमधील डीप वेन थ्रोम्बोसिसमुळे (गाठी) शरीराच्या प्रभावित भागामध्ये दुखणे, सूज येणे आणि तो भाग लालसर होणे अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात; परंतु यामधील सर्वांत मोठा धोका जेव्हा या गाठी फुटून त्या फुफ्फुसांपर्यंत जातात आणि त्यामुळे पल्मनरी एम्बॉलिझम होते. 

‘व्हीटीई’ म्हणजे शिरांमध्ये तयार होण्यास सुरुवात होते. हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक नंतर ही तिसरे शिरांसंबंधी समस्या आहे, ज्यामुळे दर वर्षी भारतातील तीन ते सहा लाख व्यक्ती प्रभावित होतात. ज्याचे स्वरूप डीप वेन थ्रोम्बोसिस (डिव्हीटी) म्हणजे खोल शिरेमधील गाठ जी शक्यतो पायात किंवा पल्मोनरी एम्बोलीजमच्या (पीई) रूपात होते. पल्मोनरी एम्बोलीजममध्ये डिव्हीटीची गाठ शिरांच्या भिंतीपासून दूर जाऊन फुफ्फुसांपर्यंत जाऊन पोहोचते आणि काही किंवा पूर्ण रक्त प्रवाह अडवते. ‘व्हीटीई’ ही पुन्हा पुन्हा उद्भवणारी समस्या असून, यामुळे पोस्ट थ्रोम्बोटिक सिंड्रोम पोस्ट डिव्हीटी किंवा क्रोनिक थ्रोम्बो-इम्बोलिक पल्मोनरी हायपर टेन्शन या दीर्घकालीन गुंतागुंत उद्भवू शकतात.

रुबी हॉल क्लिनिकतर्फे घेतलेल्या चार दिवसांच्या डिव्हीटी जागृती परिसंवादादरम्यान तज्ज्ञांनी प्रॅक्टिशनर्स, नर्सेस आणि फिजिशियन्सना डीप वेन थ्रोम्बोसीसबाबत काळजीपूर्वक लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत, कारण याची कुठलीच ठराविक लक्षणे दिसून येत नाही. या विषयी बोलताना रुबी हॉल क्लिनिकचे बोन मरो ट्रान्सप्लांट विभागाचे संचालक व हेमॅटोलॉजिस्ट डॉ. रामानन म्हणाले, ‘या परिस्थितीचा धोका कुणालाही निर्माण होऊ शकतो, तरीही काही विशिष्ट प्रकारच्या रुग्णांना ‘डिव्हीटी’ होण्याचा धोका इतरांपेक्षा जास्त असतो. ज्या रुग्णाची हिप प्रत्यारोपण शस्त्रक्रिया किंवा मग गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया किंवा कर्करोग शस्त्रक्रिया किंवा मग एखादी पोटासंबंधी शस्त्रक्रिया झालेल्या रुग्ण किंवा जास्त काळ एखाद्या गंभीर आजारामुळे रुग्णालयात असलेले रुग्ण ज्यांच्या शरीराची जास्त हालचाल होत नाही अशा रुग्णांमध्ये अशा प्रकारची व्याधी होण्याच्या शक्यता जास्त असतात.’


या वेळी रुबी हॉल क्लिनिकचे कन्सल्टंट व्हॅस्क्युलर सर्जन डॉ. धनेश कामेरकर म्हणाले, ‘‘व्हीटीई’साठी कमीतकमी तीन महिन्यांची अँटीकोअ‍ॅगुलेशन थेरपीची सामान्यतः गरज असते. ‘व्हीटीई’मधून वाचलेला रुग्ण किंवा अँटीकोअ‍ॅगुलेशन थेरपी पूर्ण केलेल्या रुग्णांमध्ये तरीही इतर गुंतागुंतींची जोखीम असते. ज्या रुग्णांमध्ये अँटीकोअ‍ॅगुलेशन थेरपी थांबविली जाते, अशा ‘डीव्हीटी’ किंवा ‘पीई’ने ग्रस्त असलेल्या रुग्णांपैकी २० टक्क्यांहून अधिकांना ही समस्या परत उद्भवू शकते. ज्यात रुग्णालयात पुन्हा दाखल होणे किंवा मृत्यूचाही धोका असतो.’

‘रुबी’च्या आयसीयूच्या संचालिका डॉ. प्राची साठे म्हणाल्या, ‘भारतातील हॉस्पिटलमध्ये रुग्णांचा पल्मनरी एम्बोलिझममुळे होणारा मृत्यू रोखला जाऊ शकतो. तरीही सामान्यत: वेनस थ्रॉम्बोएम्बॉलिझम आणि विशेष करून पल्मनरी एम्बोलिझम यांच्याकडे एक गंभीर आरोग्यसमस्या म्हणून अजूनही दुर्लक्ष होते. भारतात या विषयावर अधिक जागरूकतेची गरज आहे. या स्थितीतील जोखीम कमी करण्यासाठी नर्सेस, सर्जन्स, हेमॅटोलॉजिस्ट, प्रशिक्षणार्थी व्यक्ती यांना समाविष्ट करून घेणे गरजेचे आहे. ज्यामुळे नावीन्यपूर्ण पद्धती समोर येऊ शकतात. रुग्णालयामध्ये होणार्‍या ‘व्हीटीई’च्या समस्या रोखण्यासाठी रुबी हॉल क्लिनिकने ‘व्हीटीई’संबंधी प्रोटोकॉल प्रस्थापित केले असून, ते राबविण्यात येतात. 

‘रुबी हॉल क्लिनिकमध्ये रुग्णांच्या सुरक्षेला सर्वांत जास्त प्राधान्य दिले जाते. आम्ही आमच्या डॉक्टर्स आणि इतर नर्सिंग स्टाफला आरोग्य क्षेत्रामधील बदलांबरोबर अद्ययावत ठेवण्यावर विश्वास ठेवतो. हा प्रतिबंधात्मक परिसंवाद रुग्णांना काळजी पुरवण्याच्या क्षेत्रातील आमचे आणखी एक पुढचे पाऊल आहे. ‘व्हीटीई’मुळे अगणित रुग्णांचे जीव धोक्यात येतात, त्यामुळेच आमच्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी असणे महत्त्वाचे आहे. एक देश म्हणून आणि एक रुग्णालय म्हणून ‘व्हीटीई’पासून मुक्त होण्याची आता वेळ आली आहे,’ असे रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट म्हणाले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search