Next
द रॉयल कनॉट बोट क्लब
प्रेस रिलीज
Thursday, January 11, 2018 | 12:56 PM
15 0 0
Share this story


पुणे : १९व्या शतकात सुरू झालेला ‘द रॉयल कनॉट बोट क्लब’ या वर्षी वैभवशाली यशस्वी दीडशे वर्षे पूर्ण करत आहे. क्रीडासंबंधी उत्तम सुविधा पुरविणाऱ्या या क्लबमध्ये नवीन आधुनिक क्रीडा संकुल निर्माण करण्याची योजना एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, अशी माहिती क्लबचे अध्यक्ष बाळकृष्ण हेगडे, मानद सचिव अरुण कुदळे आणि गोपाळदास डावरा यांनी १० जानेवारी रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

बाळकृष्ण हेगडे या वेळी म्हणाले, ‘१८६८मध्ये ‘पूना बोट क्लब’ या नावाखाली रॉयल कनॉट बोट क्लबची स्थापना करण्यात आली व १८८९मध्ये नाव बदलून ‘पूना रॉयल कनॉट क्लब’ असे नामकरण करण्यात आले. हे नामकरण द ड्यूक ऑफ कनॉट व बॉम्बे आर्मीत १९२८मध्ये कार्यरत असलेले ‘कमांडर इन चीफ’ यांच्या सन्मानार्थ करण्यात आले. शताब्दी वर्ष साजरे करण्याकरिता, आम्ही लवकरच आमचे सदस्य व अतिथी यांच्याकरिता अद्ययावत क्रीडा संकुल उभारणार आहोत आणि तालुका व राज्यपातळीवरील क्रीडा स्पर्धांचे आमच्या क्लबमध्ये आयोजन करणार आहोत. आम्ही अजून एक इमारत उभारणार आहोत; ज्यामध्ये साऊंडप्रुफ रिक्रएशन सुविधा व शंभर वाहनांसाठी बेसमेंट पार्किंगची सुविधा उपलब्ध असणार आहे. एकंदरीत २०१८मध्ये आम्ही क्लबला नवे रूप देणार आहोत.’

अरुण कुदळे म्हणाले, ‘द रॉयल कनॉट बोट क्लबला दीडशे वर्षांचा समृद्ध वारसा लाभला आहे. भविष्यात अजून उत्साहाने काम करण्याचा आमचा मानस आहे. आधुनिक क्रीडा संकुलामध्ये टेनिस आणि जलतरण यासह अन्य क्रीडा सुविधांमध्ये सुधारणा करत, जिम, झुंबा, योगा, बॅडमिंटन, स्क्वाश, बुद्धिबळ, कॅरम बोर्ड, बिलियर्ड्स, स्नूकर, टेबल टेनिस यांसाठी उच्च दर्जाच्या सुविधा पुरविणार आहोत. याशिवाय नवीन संकुलामध्ये नवीन स्वरुपासह वातानुकूलित रिव्हर व्ह्यू लाउंज बार, रेस्टो बार, पार्टी हॉल आणि बेसमेंट पार्क असणार आहे. तसेच यावर्षी शंभर नवीन सदस्य घेण्याचे आमचे ध्येय आहे.’ 

१९३३मध्ये अॅमॅच्युअर रोइंग असोसिएशनची निर्मिती, पुण्यातील द रॉयल कनॉट बोट क्लब येथे झाली आणि त्यानंतर या अॅमॅच्युअर रोइंग स्पर्धेचे आयोजन फिरत्या स्पर्धेच्या पध्दतीने पुणे, चेन्नई आणि कोलकाता येथे करण्यात आले. पहिल्या आंतरराष्ट्रीय रेगाटा स्पर्धेचे आयोजन १९७६-७७मध्ये क्लबच्या अंतर्गत झाले होते. क्लबने १९८२, १९८३ आणि १९८५मध्ये राष्ट्रीय रोइंग चॅम्पियनशिप आयोजित केली होती.

कमांडर के. बी. गोदरेज, एस. एल. किर्लोस्कर, डॉ. बी..बी. गोखले, फ्राम पोचा गुस्तास्प रशीद, चंद्रकांत शिरोळे, हसमुख शाह, एस. एस. कानिटकर, विजय भावे, गोपाळदास डावरा, निळूभाऊ लिमये, डॉ. घारपुरे यांच्यासारखे अनेक दिग्गज सदस्य लाभणे, हे द रॉयल कॅनॉट बोट क्लबचे भाग्य आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link