Next
‘एमआयटीडब्ल्यूपीयू’तर्फे संगीत भारतीचे आयोजन
प्रेस रिलीज
Wednesday, December 06 | 06:03 PM
15 0 0
Share this story

पत्रकार परिषदेत माहिती देताना डावीकडून प्रा. पल्लवी आद्य, प्रा. कल्याणी बेलसरे, प्रा. शलाका घोडके.पुणे : ‘डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या (एमआयटीडब्ल्यूपीयू) फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंटतर्फे (Under Graduate) संगीत भारती या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन स्पर्धेचे तसेच एन्थुजिया महोत्सव २२ व २३ डिसेंबर रोजी रंगणार आहे,’ अशी माहिती संगीत भारतीच्या संयोजिका कल्याणी बेलसरे, एन्थुजियाच्या संयोजिका प्रा. पल्लवी आद्य, प्रा. शलाका घोडके यांनी दिली.

बेलसरे म्हणाल्या, ‘११वी ते पदवीच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. स्पर्धेचे परीक्षण शास्त्रीय गायन क्षेत्रातील मान्यवर करणार आहेत. भारतीय शास्त्रीय संगीत मुलांपर्यंत पोहोचावे आणि त्यांच्यातील गायक, नर्तक शोधावेत हा स्पर्धेमागचा उद्देश आहे. स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. यामध्ये जवळपास ४०-५० स्पर्धक सहभागी होतील. सावनी दातार या स्पर्धेचे परीक्षण करतील. प्रथम व द्वितीय क्रमांकास रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह दिले जाणार आहे.’ आरती अंकलीकर-टिकेकर, आदिनाथ मंगेशकर यांच्यासारख्या मान्यवरांचे मार्गदर्शन आयोजनात मिळत असल्याचे सांगून महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर. एम. चिटणीस प्रोत्साहित करत असल्याचे त्या म्हणाल्या.

प्रा. आद्य म्हणाल्या, ‘एन्थुजियाचे हे सातवे वर्ष आहे. ऑगस्टमध्ये ११, १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी, तर डिसेंबरमध्ये ११वी ते सिनिअर कॉलेजच्या मुलांसाठी अशा दोन टप्प्यांत हा महोत्सव रंगतो. जवळपास १७०० विद्यार्थी यामध्ये सहभागी होतात. बौद्धिक, व्यवस्थापन, सांस्कृतिक, क्रीडा कौशल्य सादर करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते.’

प्रा. आद्य पुढे म्हणाल्या, ‘भारतीय संस्कृतीची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजावीत आणि त्यांना आपल्यातील कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे, हा यामागील उद्देश आहे. महोत्सवात विविध स्पर्धांचेही आयोजन केले जाते. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येते. ‘स्पोर्ट फिएस्टा’मध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस, फुटबॉल, बास्केटबॉल या स्पर्धा होतात.’

संगीत भारतीविषयी :
दिवस : शुक्रवार, २२ डिसेंबर २०१७
स्थळ : एमआयटी, कोथरूड, पुणे  

अधिक माहितीसाठी संपर्क :
९९२१० ५९४६१
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link