Next
देशातील पहिली एअरट्रेन नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर होणार
अंतर्गत प्रवासासाठी विशेष सुविधा
BOI
Tuesday, April 30, 2019 | 02:09 PM
15 0 0
Share this article:

प्रातिनिधिक फोटो

नवी दिल्ली : नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अंतर्गत प्रवासासाठी लवकरच ‘एअरट्रेन’ सुरू केली जाणार आहे. एअरट्रेन म्हणजे खास विमानतळासाठी असलेली मेट्रो रेल्वेची सुविधा. अशी सुविधा असणारा हा देशातील पहिला विमानतळ ठरणार आहे. 


लंडनचा हिथ्रो विमानतळ, न्यूयॉर्कचा जॉन. एफ. केनेडी विमानतळ, तसेच झुरीच, हाँगकाँग अशा आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या टर्मिनल्सवरून थेट मेट्रो स्टेशन्सपर्यंत जाण्याकरिता रेल्वे सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे प्रवाशांना विमानतळावर उतरल्यावर इच्छित स्थळी जाण्याकरिता रेल्वेनेच थेट मेट्रो स्टेशनवर जाता येते. याच धर्तीवर दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही मेट्रो ट्रेनची सुविधा साकारण्यात येत आहे. 


या एअरट्रेन प्रकल्पासाठी २५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडने (डीआयएएल) निधी उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. टी वन, टी टू, टी थ्री हे टर्मिनल्स या ‘एअरट्रेन’द्वारे जोडले जाणार असून, विमानतळानजीकचे एरोसिटी हे हॉटेल संकुलही याद्वारे जोडले जाणार आहे. सध्या विमानतळावरून ‘टर्मिनल थ्री’वर सहज जाता येते, तर टर्मिनल वन आणि टूवर जाण्यासाठी बसेसचा वापर केला जातो. हा बसप्रवास एअरट्रेनमुळे थांबणार असून, प्रवाशांना सहजपणे विमानतळाबाहेर पडणे किंवा वेगळ्या टर्मिनलवर जाणे शक्य होणार आहे. एका विमानाने येऊन पुढच्या प्रवासाठी दुसऱ्या टर्मिनलवरील विमान पकडायचे असल्यास, अशा तिकीट असलेल्या प्रवाशांना ही सेवा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. दर वीस मिनिटांनी ही ट्रेन धावणार आहे. 


एअरट्रेन प्रकल्प २०१६मध्ये मांडण्यात आला होता. तो २०२०पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र अद्याप त्याचे बांधकाम सुरू झालेले नाही. त्यामुळे २०२०मध्ये तो पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे; तरीही आता या प्रकल्पाला गती मिळाल्याने लवकरच तो पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search