Next
लोहगाव विमानतळ पायाभूत समितीची बैठक
प्रेस रिलीज
Wednesday, January 31 | 12:20 PM
15 0 0
Share this story

खासदार अनिल शिरोळेपुणे : लोहगाव विमानतळासाठी राज्य सरकारतर्फे द्यावयाच्या २५ एकर जमीनीची हस्तांतरण प्रक्रिया तातडीने करण्याचे निर्देश, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य सरकारचे प्रतिनिधी व पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट यांना दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पायाभूत समितीच्या बैठकीत दिल्याची माहिती, खासदार अनिल शिरोळे यांनी दिली आहे. 

या बैठकीला पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष गुरुप्रसाद महापात्रा, अजय कुमार, एस. विस्वास तसेच, संरक्षण खात्याचे अतिरिक्त सचिव बरून मित्रा व हवाई दलाचे अधिकारी उपस्थित होते.
 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरीबैठकीत विमान नगर ते लोहगाव विमानतळ तसेच, पुढे विकफिल्ड चौक हा रस्ता तयार करण्यासाठी महानगर पालिका, विमानतळ प्राधिकरण आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक तातडीने बोलाविण्याची सूचनादेखील गडकरी यांनी केली. त्याचप्रमाणे विमानतळ धावपट्टी विस्तारीकरण आणि विमानांच्या उड्डाणसंख्येत वाढ हे दोन मुद्दे लोहगाव विमानतळाच्या विकासासाठी महत्वाचे असल्याने, त्यावर संरक्षण खात्याने कार्यवाही करावी, असेदेखील गडकरी यांनी नमूद केले. 

दरम्यान, लोहगाव विमानतळ येथील कार्गो सुविधा वाढविण्यासाठी आवश्यक असलेली, हवाई दलाच्या वापरात नसलेली जमीन विमानतळ प्राधिकरणाकडे वर्ग करण्याची सूचना बैठकीत करण्यात आल्याचे शिरोळे म्हणाले.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link