Next
जेट एअरवेजतर्फे नव्या वर्षातील प्रवासासाठी खास सवलत
प्रेस रिलीज
Friday, December 22 | 06:27 PM
15 0 0
Share this story

मुंबई : जेट एअरवेजने नव्या वर्षाच्या निमित्ताने खास सेल जाहीर केला आहे.यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांना चांगल्या सवलतीचा लाभ घेता येईल. यामध्ये इकॉनॉमी शुल्कावर दहा टक्के सवलत, तर प्रीमियर शुल्कावर १५ टक्के सवलत दिली जाणार असून प्रवाशांना नव्या वर्षात एअरलाइनच्या देशांतर्गत ४४ ठिकाणांच्या नेटवर्कवर आकर्षक बचत करता येईल. 

हा ११ दिवसीय सेल २३ डिसेंबर २०१७ ते दोन जानेवारी २०१८ पर्यंत सुरू राहील. या सेलदरम्यान प्रवासी एक हजार रुपयांचे तिकिट आरक्षित करू शकतील, ज्याची अधिकृत मुदत १५ जानेवारी २०१८ नंतर सुरू होईल.एअरलाइनतर्फे हाताळल्या जाणाऱ्या थेट विमानसेवेवर खास भाडे आकारले जाईल.
 
याबाबत जेट एअरवेजचे संचालक गौरांग शेट्टी म्हणाले, ‘जेट एअरवेज प्रवाशांना अविस्मरणीय अनुभव देण्याची प्रत्येक संधी वापरत असते. या ऑफरद्वारे प्रवासी त्यांच्या सहलीचे नियोजन करताना लक्षणीय बचत करू शकतील. ही योजना भारतातील आमच्या प्रवाशांमध्ये लोकप्रिय होईल याची खात्री आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link